आमदार संजय जगताप यांच्या उपस्थितीत इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
पक्षास मिळणार अधिकचे बळ

आमदार संजय जगताप यांच्या उपस्थितीत इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
पक्षास मिळणार अधिकचे बळ
इंदापूर : प्रतिनिधी
पुणे जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने “व्यर्थ न हो बलिदान” देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पुणे जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियातील व्यक्तींचा सन्मान सोहळा सोमवारी (दि.१६) राजगुरुनगर येथे पार पडला. या कार्यक्रमात इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांचे प्रवेश झाले.
सुराज्य निर्माण सेना महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष आकाश पवार यांनी जिल्ह्यातील काँग्रेसच्या प्रमुख मंडळींच्या उपस्थितीत प्रवेश केला. आकाश पवार हे राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका उपाध्यक्ष होते. त्यांनी २०१७ मध्ये निमगाव केतकी गणातून पंचायत समिती लढवली आहे. सुराज्य निर्माण सेनेच्या इंदापूर तालुक्यामध्ये १५ शाखा आहेत.ते कळंब गावचे सुपुत्र आहेत.याच बरोबर इंदापूर तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथील युवराज गायकवाड यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ते रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य इंदापूर तालुकाध्यक्ष आहेत. ते पिंपरी गाव व पंचक्रोशीत सर्वसामान्यांची कामे करण्यासाठी नेहमी अग्रेसर असतात. यासह नरुटवाडी येथील पशुवैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉक्टर संतोष होगले यांनी देखील पक्षात प्रवेश केला. त्यांचा ही उजनी पाणलोट क्षेत्रात दांडगा संपर्क आहे.काँगेसचे पुणे जिल्हाध्यक्ष तथा आमदार संजय जगताप यांनी सर्वांचे पक्षामध्ये स्वागत केले.यावेळी माजी खासदार अशोक मोहोळ,माजी जिल्हाध्यक्ष देविदास भन्साळी प्रमुख उपस्थित होते.
काँग्रेस हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. इंदापूर तालुक्यात पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. येणाऱ्या काळात युवकांसह सर्वसामान्यांना काम करण्याची संधी देऊन त्यांच्यामागे पक्षाची ताकद उभा करू असे मत इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष स्वप्निल सावंत यांनी व्यक्त केले.
यावेळी तालुका काँग्रेस उपाध्यक्ष आबासाहेब निंबाळकर,इंदापूर शहराध्यक्ष चमनभाई बागवान, इंदापूर विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष शंभूराजे साळुंखे,महादेव लोंढे, पुणे जिल्हा सरचिटणीस जकिर काझी,निवास शेळके,दत्तात्रेय देवकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.