आयुष्य घडवण्यासाठी वाचन महत्त्वाचे -शरद तांदळे
आपण रोज उत्साहाने काम करणे अशी यशाची व्याख्या

आयुष्य घडवण्यासाठी वाचन महत्त्वाचे -शरद तांदळे
आपण रोज उत्साहाने काम करणे अशी यशाची व्याख्या
बारामती वार्तापत्र
शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे, कॉलेज ऑफ कॉमर्स सायन्स अँड कॉम्प्युटर एज्युकेशन, माळेगाव बुद्रुक मध्ये मंगळवार दिनांक 18 मार्च 2025 रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संस्थेच्या शरद सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता.
यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा मे -जून 2024 मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्रथम क्रमांक 4000/-, द्वितीय क्रमांक 3000 /- आणि तृतीय क्रमांक 2000/- रुपये असे एकूण 1 लाख 8 हजार रुपयांचे रोख तसेच ‘गुंजन’या सांस्कृतिक कार्यक्रम अंतर्गत पार पडलेल्या विविध स्पर्धांचे तसेच क्रीडा स्पर्धेचे बक्षीस ट्रॉफी व प्रशस्तीपत्र स्वरूपात देऊन विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. शरद तांदळे प्रसिद्ध उद्योजक व लेखक,पुणे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अजित चांदगुडे यांनी केले.प्राचार्य यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना त्यांच्या “रावण” पुस्तकाबद्दल माहिती ही दिली.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्री. शरद तांदळे यांनी जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर अभ्यास आणि मेहनत याचे महत्त्व विशद केले यामध्ये त्यांनी यश हे गंथव्यास्थान नसून तो एक चिरकाल चालणारा प्रवास आहे आणि यश म्हणजे जे आपण ठरवलंय त्या विषयावर आपण रोज उत्साहाने काम करणे अशी यशाची व्याख्या विद्यार्थ्यांना पटवून दिली.
स्पर्धेच्या युगात टिकून राहण्याकरता आपली स्वप्न मोठी पाहिजे त्यासाठी आपल्या मेंदूचा आवाका वाढवा त्यासाठी आपण रोज वाचन केलं पाहिजे असा मोलाचा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजन यशस्वी होण्याकरता संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. केशव बापू जगताप तसेच विश्वस्त श्री. अनिल दादा जगताप, श्री. वसंत काका तावरे, श्री. रवींद्र दादा थोरात, श्री. गणपत आबा देवकाते, श्री. महेंद्र अण्णा तावरे, श्री. रामदास बापू आटोळे, सौ. चैत्राली गावडे,सौ. सीमा जाधव तसेच संस्थेचे सचिव डॉ. धनंजय ठोंबरे यांचे सहकार्य लाभले.