आरक्षणाच्या मुद्द्यावरून बारामतीत भाजपा चे चक्काजाम आंदोलन..
सरकार ओबीसी आणि मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

आरक्षणाच्या मुद्द्यावरून बारामतीत भाजपा चे चक्काजाम आंदोलन..
सरकार ओबीसी आणि मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
बारामती वार्तापत्र
ओबीसी आणि मराठा आरक्षणाकडेे महाविकासआघाडी सरकार जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ आज राज्यभरात भाजपकडून राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे.याचाच एक भाग म्हणून बारामतीत भाजपच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
बारामती शहरातील भाजप कार्यालयापासून हलगी नाद करत भाजप कार्यकर्त्यांकडून शहरातील तीनहत्ती चौकात ठिय्या मांडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनात शहर व तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. आंदोलनादरम्यान महाविकासआघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
ओबीसीला आरक्षण मिळू नये म्हणून महाविकास आघाडी सरकारने जाणून बुजून प्रयत्न केले आहेत. पंधरा वेळा इम्पीरियल डाटा मागूनही न्यायालयाला सादर केला नाही. त्यामुळे ओबीसींचे आरक्षण रद्द झाले आरक्षण रद्द करण्यासाठी आघाडी सरकारने जाणून-बुजून केलेली ही कृती असून ओबीसींच्या विरोधातील ह्या सरकारने ओबीसींचे फार मोठे नुकसान केले असल्याचा आरोप भाजपचे बारामती तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे यांनी यावेळी केला.