स्थानिक

आरोग्य सेवकाला आरोग्य केंद्रात मारहाण.

मुलगी झाल्याच्या रागातून मारहाण.

आरोग्य सेवकाला आरोग्य केंद्रात मारहाण

मुलगी झाल्याच्या रागातून मारहाण.

बारामती :वार्तापत्र

मुलगी झाली व मारहाण झाली घटना झाली आरोग्य केंद्रात . मुलगी झाल्याच्या रागातून एका माथेफिरूने आरोग्य केंद्रात गोंधळ घालत पत्नीसह आरोग्य सेवकाला मारहाण केल्याची घटना बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे घडली.

याबाबत कृष्णा बाळासाहेब काळे(रा. डोर्लेवाडी) याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा अन्यासह मारहाणप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत बाळू नाना चव्हाण या आरोग्य सेवकाने फिर्याद दिली आहे.

सदर घटना शुक्रवार दि.२७ रोजी दुपारी एक वाजता डोर्लेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात घडली.

कृष्णा काळे यांच्या पत्नीने गुरुवारी एका मुलीला जन्म दिला. मुलगी झाली म्हणून पत्नीला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.

तसेच येथे काम करत असणाऱ्या आरोग्य सेवकाला व डॉक्टरांना शिवीगाळ करून दमदाटी केली.

यावेळी आरोग्य सेवकाने काळे यांना बाहेर जाण्यास सांगितल्याचा राग मनात धरून फिर्यादीला दगडाने मारहाण केली. असे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Articles

Back to top button