
संजय गांधी निराधार योजनेत 205 अर्जदारांना मान्यता
निकष न पूर्ण केलेले पाच अर्ज नामंजूर
बारामती वार्तापत्र
संजय गांधी निराधार योजनेच्या बैठकीत 205 लाभार्थ्यांच्या अर्जांना मंजुरी देण्यात आली तर चार अर्ज अपात्र ठरले. या बैठकीस तहसीलदार अनिल ठोंबरे यांच्यासह नायब तहसीलदार वयकर मॅडम बीडीओ विजयकुमार परीट, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सागर बाबा मिसाळ यांच्यासह हनुमंत कांबळे, रेहना मुलाणी, लक्ष्मण परांडे, महादेव लोंढे, नितीन शिंदे, दत्तात्रय बाबर, अजय भिसे, प्रमोद भरणे, आबासाहेब निंबाळकर यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.
शासकीय योजनेच्या लाभासाठी एकूण 209 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी दोनशे पाच अर्ज मंजूर करण्यात आले. यात संजय गांधी विधवा योजनेसाठी 48, संजय गांधी अपंग योजनेसाठी 23, श्रावण बाळ योजनेसाठी 80, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेसाठी 49, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेसाठी 5 अर्ज मंजूर करण्यात आले. चार अर्ज योजनेच्या निकषात न बसल्याने नामंजूर करण्यात आले. नामंजूर करण्यात आलेल्या अर्ज धारकांना आवश्यक निकषासह ते पुन्हा सादर करण्यास सांगितले जाईल. असे तहसीलदार तथा संजय गांधी निराधार योजना शासकीय समितीचे सचिव अनिल ठोंबरे यांनी बैठकीत सांगितले.
यावेळी सागरबाबा मिसाळ म्हणाले की, आजच्या बैठकीत दोनशे पाच अर्ज मंजूर झाले असून आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या अर्जना मान्यता मिळाली आहे. ज्या हेतूसाठी आपण सर्वांची या योजनेच्या कामासाठी माझी नियुक्ती करण्यात आली आहे.या योजनेचा उद्देश आपण तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्व सदस्य सचिव एकोप्याने काम करून योजनेचा हेतू सफल करूया.