इंदापूरचा सुपुत्र विजय बनसुडे महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत राज्यात पहिला
इंदापूर तालुक्यासह परिसरात सर्वत्र कौतुकाचा वर्षाव
इंदापूरचा सुपुत्र विजय बनसुडे महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत राज्यात पहिला
इंदापूर तालुक्यासह परिसरात सर्वत्र कौतुकाचा वर्षाव
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील पळसदेव चे रहिवाशी विजय सुनिल बनसुडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील विजय सुनिल बनसुडे यांनी आपल्या कठोर मेहनतीच्या जिद्दीच्या आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस उपनिरीक्षक पदाचा बहुमान मिळवला आहे. त्यामुळे त्यांचे इंदापूर तालुक्यासह परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
२४ डिसेंबर २०१७ रोजी घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यांनी या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक घेत इंदापूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. कोणत्याही प्रकारची ट्युशन अथवा स्पर्धा परीक्षेची ॲकॅडमी मध्ये प्रवेश न घेता केवळ अभ्यासू विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन घेत घरीच अभ्यास करून जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.