इंदापूरच्या कर्मयोगी कारखान्यावर शेतकऱ्यांचे काटा बंद आंदोलन
ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर ऊस बिल न दिल्याने शेतकरी आक्रमक
इंदापूरच्या कर्मयोगी कारखान्यावर शेतकऱ्यांचे काटा बंद आंदोलन
ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर ऊस बिल न दिल्याने शेतकरी आक्रमक
इंदापूर : प्रतिनिधी
कर्मयोगी शंकरराव पाटील कारखान्याची माघील एफआरपी (FRP) व थकीत रक्कम द्या, या मागणीसाठी ऊस उत्पादक (Sugarcane Farmer) शेतकऱ्यांनी कारखान्याचा काटा बंद करून आक्रमक पवित्रा घेतला आहे.
थकीत एफआरपीची रक्कम दिल्याशिवाय पुढील गळीत हंगाम चालू करता येत नाही परंतु शासनाचे नियम धाब्यावर बसवून सन २०२१-२२ साठी चा गळीत हंगाम चालू करण्यात आला आहे.कारखान्यांची थकीत बिले मिळत नाहीत. पाठपुरावा करणाऱ्यांची मुस्कटदाबी सुरु आहे. शेतकऱ्यांवर दडपशाही सुरु आहे,ऐन दिवाळीच्या महूर्तावर आमच्या बिलांची रक्कम थकवली आहे.आमच्या घरातील व्यक्ती विविध आजारांनी ग्रस्त आहेत.त्यांच्या औषध उपचारासाठी पैसे नाहीत त्यामुळे आम्हाला आत्महत्या केल्या शिवाय पर्यायच उरला नाही अशा भावना संतप्त शेतकऱ्यांना यावेळी व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान इंदापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तयूब मुजावर यांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न राखला जावा या उद्देशाने कारखान्याचे संचालक व शेतकऱ्यांचा समेट घडवण्याचा प्रयत्न केला परंतु सदरील चर्चा निष्पफळ ठरली आहे.जो पर्यंत थकीत रक्कम देण्यात येत नाही तोपर्यंत आमच्या मागण्यांवर ठाम असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.