इंदापूर

इंदापूरच्या रस्त्यांची आवस्था सुधारण्यास निघालेल्यांचा अजब मापे गजब कारभार;बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक

संबधीत इंजिनिअर वर गुन्हे दाखल करण्याची मागणी

इंदापूरच्या रस्त्यांची आवस्था सुधारण्यास निघालेल्यांचा अजब मापे गजब कारभार;बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक

संबधीत इंजिनिअर वर गुन्हे दाखल करण्याची मागणी

इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर शहरात वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ४६ कामांना मंजुरी मिळाली असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कामांना सुरुवात देखील करण्यात आली आहे. मात्र मंजूर करण्यात आलेल्या कामकाज आराखड्यात व प्रत्यक्षात चालू असणाऱ्या रस्त्याच्या कामांच्या ठिकाणी मोठी तफावत असल्याचे निदर्शनास आल्याने बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सदरील चालू ठिकाणच्या कामांवर आक्षेप घेतला आहे.

वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत इंदापूर शहरातील इंद्रेश्वर नगर या ठिकाणी सोमवार दि.८ रोजी रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती.मात्र दि.९ रोजी बहुजन मुक्ती पार्टी चे राष्ट्रीय महासचिव ॲड. राहुल मखरे यांसह संजय शिंदे,नानासाहेब चव्हाण, रोहित ढावरे,नागेश भोसले,सूरज धाईंजे व अन्य कार्यकर्त्यांनी काम चालू असणाऱ्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेल्या आराखड्यातील कामांची लांबी,रुंदी,प्रत्यक्ष मोजमापे करून तपासली असता त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आल्याने सदरील कामाविषयी आक्षेप घेत काम बंद ठेवण्याची विनंती केली.व याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांसह सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे, पुणे जिल्हाधिकारी, इंदापूर तहसीलदार, इंदापूर पोलिस स्टेशन व माध्यमांना दिले आहे.

इंद्रेश्वर नगर येथील मंजूर करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामकाज आराखड्यात कालठण रोड ते पांढरे घर या रस्त्याची लांबी १५० मीटर व रुंदी ३ मीटर दाखवण्यात आली असून प्रत्यक्षात मोजणी केल्यास याची लांबी १३६ मीटर भरते आहे,तसेच पांढरे घर ते पाडुळे घर याची लांबी १०० मीटर दाखवण्यात आली असून प्रत्यक्षात ती ३५ मीटर भरते. याशिवाय पाडुळे घर ते राजापूरे घर याची लांबी १०० मीटर दाखवण्यात आली असून ती ३८ मीटर भरते,तर कालठण रोड ते अनिल देवकर घर याची लांबी १५० मीटर दाखवण्यात आली असून ती १२३ मीटर भरते आहे.पवन घनवट घर ते संदीप काळे घर हा रस्ता १०० मीटर लांबीचा दाखवण्यात आला असून तो ३८ मीटर भरतो आहे. जाधव घर ते तरंगे घर रस्ता देखील १०० मीटरचा दाखवण्यात आला असून तो प्रत्यक्षात ५२ मीटर भरतो आहे. असे एकूण मंजूर आराखड्यात ७०० मीटर एकूण कामाची लांबी दाखवण्यात आली असून प्रत्यक्षात मात्र ती ४२२ मीटर भरत असल्याचा आरोप बहुजन मुक्ती पार्टी च्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

मंजूर आराखड्यात एकूण दाखवण्यात आलेल्या ७०० मीटर कामापेक्षा सदरील काम २७८ मीटरने कमी भरत असून यातील फरकाची टक्केवारी ४० टक्के आहे. मंजूर आराखड्याप्रमाणे प्रस्तुत कामाची रक्कम १७ लाख ४४ हजार ३९ रुपये इतकी असून त्यापैकी ४० टक्के काम होऊ शकत नसेल तर ६ लाख ९७ हजार ६१५ रुपये एवढी जादा रक्कम मंजूर आराखड्यात दाखवण्याची गरजच काय आहे,असा प्रश्न तक्रारदार संजय शिंदे यांनी उपस्थित केला आहे.त्यामुळे सदरील रस्त्याच्या कामांच्या आराखड्याची दुरुस्ती होऊनच काम सुरू करण्यात यावे आणि आराखडा बनवणाऱ्या संबंधित इंजिनिअर वर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा स्वरूपाची मागणी तक्रारदार संजय शिंदे यांच्याकडून करण्यात आली आहे.

याविषयी इंदापूर नगरपरिषदेचे बांधकाम विभागाचे इंजिनियर रविराज राऊत यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता ते म्हणाले की, सदरील काम हे सार्वजनिक बांधकाम विभाग करत असून इंदापूर नगरपरिषदेने नगर परिषदेच्या क्षेत्रात सदरचे काम करण्यास केवळ परवानगी दिलेली असून नगरपरिषदेचा आणि या कामांचा कोणताही संबंध नाही.

तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता किशोर साळुंखे यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता ते म्हणाले की, सदर कामाचा कामकाज आराखडा हा सार्वजनिक बांधकाम विभागाने बनवला आहे.परंतु याची मापे स्थानिक नगरसेवकांमार्फत आलेली आहेत. आराखड्यातील मापे जास्त आहेत पण आम्ही काय त्यांना दाखवल्याप्रमाणे बिल दिले का? जरी मंजुरी दिली असली तरी प्रत्यक्षात एखादा रस्ता मापा पेक्षा जास्त असतो मात्र मंजुरीत तो कमी असतो, जर यातून काही लांबी उरली तर आम्ही नगरपरिषदेची मंजुरी घेऊन जिथे कुठे आवश्यकता असेल तिथे ती कामे करू शकतो,त्यात काय एवढ असे म्हणत कामाचा दर्जा कुठे मार खाल्लाय का ? असा पुन: प्रश्न विचारण्यास मात्र ते विसरले नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!