![](https://baramatiwarta.in/wp-content/uploads/2024/10/IMG-20241030-WA0024-780x470.jpg)
इंदापूरच्या विकासासाठी ५ वर्षे संधी द्या : प्रवीण माने
भिगवण परिसरात गावभेट दौरा
इंदापूर; प्रतिनिधि
इंदापूर तालुक्याने आजी-माजी आमदारांना तीस वर्षे संधी दिली एकदा रुईच्या माने परिवाराला पाच वर्षे संधी देवून बघा संधीचे सोने करून दाखविलं जाईल असे आश्वासन इंदापूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांनी केले.
भिगवण परिसरातील तक्रारवाडी, डिकसळ, मदनवाडी, विरवाडी, पिंपळे,शेटफळगढे, लामजेवाडी,म्हसोबावाडी आदी गावांमध्ये गावभेट दौरे करण्यात आले. डिकसळ (ता. इंदापूर) येथे प्रवीण माने बोलत होते. यावेळी ,शरद चितारे, धनंजय थोरात,मनोहर हगारे, कुंडलिक धुमाळ, दादासाहेब थोरात, विजयकुमार गायकवाड,आकाश बंडगर, तानाजी हगारे,आप्पासाहेब गायकवाड,पंकज काशिद,भागवत जाधव,सतिश सूर्यवंशी,माधुरी भोसले,डॉ. मोतीलाल सुरडे,बायडाबाई शिंदे,निलेश मोरे, अमोल सूर्यवंशी, महादेव कुंभार, विठ्ठल भोंग,सुनिल गवळी, दादा निमजकर,रवींद्र काळे,बाबु पोंदकुले, रवींद्र गवळी,योगेश काळे, कुणाल गायकवाड, संपत काळे,आदींसह ग्रामस्थ,कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
प्रवीण माने पुढे म्हणाले, तालुक्यातील रखडलेली प्रलंबित कामे मार्गी लावण्यात येतील लोकहिताची कामे मार्गी लावण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तरी जनतेसोबत रस्त्यावर उतरेल बेरोजगार तरुणांसाठी रोजगार देण्यासाठी उद्योग उभारले जातील असे आश्वासन यावेळी दिले..
किटली चिन्ह मिळण्याची अपेक्षा..
यावेळी माने यांनी सांगितले की नामनिर्देशन फॉर्म भरताना कपाट, सफरचंद आणि किटली या चिन्हयांची मागणी केली आहे. यापैकी आपल्याला किटली हे चिन्ह मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली.