इंदापूरच्या विश्व प्रतिष्ठान संचलित जिजाऊ इन्स्टिट्यूटच्या लौकिकात भर…
श्रुती जगताप या विद्यार्थिनीचे जवाहर नवोदय विद्यालयाने घेतलेल्या परीक्षेत उत्तम यश...
इंदापूरच्या विश्व प्रतिष्ठान संचलित जिजाऊ इन्स्टिट्यूटच्या लौकिकात भर…
श्रुती जगताप या विद्यार्थिनीचे जवाहर नवोदय विद्यालयाने घेतलेल्या परीक्षेत उत्तम यश…
इंदापूर:- सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी ) ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हे मोठे आव्हानं असते त्यासाठी संस्थेने निश्चित असा आराखडा तयार करून विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी शिक्षणाचा कार्यक्रम राबविणे आवश्यक असते हे ज्या संस्थेने ओळखले आहे त्या संस्थेचे विद्यार्थी व विद्यार्थिनीं यश संपादन करत असतात असेच यश इंदापूर तालुक्यातील कालठण नं.१ येथील विश्व प्रतिष्ठान मार्फत चालवल्या जाणाऱ्या जिजाऊ इन्स्टिट्यूट मध्ये दिसून येत आहे.
या इन्स्टिट्यूटमध्ये शिकणा-या श्रुती रविन्द्र जगताप या विद्यार्थिनीने भारत सरकारच्या जवाहर नवोदय विद्यालयाने घेतलेल्या परिक्षेत उत्तम यश मिळवले. या परीक्षेसाठी पुणे जिल्ह्यातील ऐंशी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती.त्यामध्ये श्रुती जगतापचा समावेश आहे.इंदापूरच्या विश्व प्रतिष्ठानमार्फत जिजाऊ इन्स्टिट्यूट चालवले जाते.
प्रा.डॉ.जयश्री गटकुळ संस्थेच्या अध्यक्षा आहेत.संस्थेच्या वतीने दर्जेदार शिक्षण दिले जाते.यामुळे मागील वर्षी चा बारावी विज्ञान विभागाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शिष्यवृत्ती परिक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळाले आहे.जवाहर नवोदय विद्यालय परिक्षेत श्रुतीने मिळवलेल्या यशामुळे संस्थेच्या लौकिकात भर पडली आहे.
संस्थेच्या अध्यक्षा प्रा.डॉ.जयश्री गटकुळ,डॉ.भास्कर गटकुळ यांनी श्रुतीचे व तिला मार्गदर्शन करणा-या प्राचार्या राजश्री जगताप,शेखर साळवे,रेखा जगताप,सुहास शिंदे, अर्चना शिंदे,प्रियांका देवकर, असिया शेख,सागर उंबरे यांचे अभिनंदन केले आहे.