इंदापूरमध्ये कोरोनाचा हाहाकार;एकाच दिवसात तब्बल 43 नव्या रुग्णांची वाढ.
दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ.
इंदापूरमध्ये कोरोनाचा हाहाकार;एकाच दिवसात तब्बल 43 नव्या रुग्णांची वाढ.
दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ.
इंदापूर:प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील कोरोनाची रुग्ण संख्या प्रचंड वेगाने वाढत असून आज दिवसभरात तब्बल नव्या 43 रुग्णांची वाढ झाली आहे.
यामध्ये इंदापूर तालुक्यातील रेडणी येथील ७३ वर्षीय पुरूष, इंदापूर शहरातील ४० वर्षीय पुरूष, रामदास गल्लीतील एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश असून यामध्ये ६५ वर्षीय महिला, ४५ वर्षीय पुरूष, ३३ वर्षीय महिला, १५ वर्षीय मुलगी, १२ वर्षीय मुलगा यांचा यामध्ये समावेश आहे. शेळगाव येथील ३४ वर्षीय पुरूष, माळवाडी नंबर २ येथील एकाच कुटुंबातील ७ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये ४८ वर्षीय पुरूष, ४० वर्षीय महिला, २६ वर्षीय पुरूष, २३ वर्षीय महिला, ४२ वर्षीय पुरूष, ३६ वर्षीय महिला, ३ वर्षीय मुलाचा समावेश आहे. भाटनिमगाव येथील ४९ वर्षीय महिला, उध्दट येथील ४५ वर्षीय महिला, इंदापूर शहरातील यशवंतनगर येथील २७ वर्षीय पुरूष, दत्तनगर येथील एक २७ वर्षीय पुरूष, अंथुर्णे येथील ५६ वर्षीय महिला, ३६ वर्षीय महिला, २० वर्षीय महिला, १२ वर्षीय मुलास कोरोनाची बाधा झाली आहे.
वालचंदनगर येथील कोरोनाग्रस्ताच्या कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची बाधा झाली असून यामध्ये २२ वर्षीय पुरूष, ५० वर्षीय पुरूष, १७ वर्षीय मुलगी, ४८ वर्षीय पुरूष, २० वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे. लोणीदेवकर येथील २६ वर्षीय युवक, बळपुडी येथील ३० वर्षीय पुरूष, कुरवली येथील एकाच कुटुंबातील सात जणांना कोरोनाची बाधा झाली असून यामध्ये ७५ वर्षीय पुरूष, ७० वर्षीय महिला, ३९ वर्षीय पुरूष, ५८ वर्षीय पुरूष, ५२ वर्षीय महिला, ४३ वर्षीय महिला, १७ वर्षीय युवकाचा यामध्ये समावेश आहे. इंदापूर शहरातील अंबिकानगर येथील ४० वर्षीय महिला व नरुटवाडी येथील ३२ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे. बारामतीतील खासगी प्रयोगशाळेत देखील इंदापूर तालुक्यातील ४ जणांचा कोरोनाबाधित झाल्याचा अहवाल आला आहे.
इंदापूर तालुक्यातील रुग्णांची एकूण संख्या 548 इतकी झाली असून 24 ऑगस्ट च्या माहितीनुसार 314 रुग्ण बरे झाले असून दि.24 ऑगस्टपर्यंत 24 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
दिवसेंदिवस वाढतच चाललेली रुग्णांची संख्या बघता खबरदारी घेणे महत्त्वाचे असून शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे महत्त्वाचे ठरणार आहे.