इंदापूर

भिगवण येथील कोविड केअर सेंटरचे एकाच दिवसात दोनदा उद्घाटन.

कोरोनामुळे तालुक्यातील जनता भयभीत झालेली असतानाच श्रेय वादाचे राजकारण पेटले.

भिगवण येथील कोविड केअर सेंटरचे एकाच दिवसात दोनदा उद्घाटन.

कोरोनामुळे तालुक्यातील जनता भयभीत झालेली असतानाच श्रेय वादाचे राजकारण पेटले.

इंदापूर:-प्रतिनिधी

इंदापूर तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा वाढता आकडा पाहता तालुक्यातील निमगाव केतकी आणि भिगवण या ठिकाणी कोविड केअर सेंटर पूर्ण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.

दरम्यान दि.8 ऑगस्ट रोजी दुपारी भिगवण येथील कोविड केअर सेंटरचा(CCC) उदघाटन समारंभ पंचायत समितीच्या सभापती पुष्पा रेडके यांच्या हस्ते व उपसभापती संजय देहाडे यांच्या उपस्थितीत दुपारी पार पडला.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती भिगवन चे माजी सरपंच पराग जाधव,कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक यशवंत आप्पा वाघ, संपत बंडगर,अशोक वणवे,सूर्यकांत सवाने, तक्रारवाडी च्या सरपंच शोभा वाघ, सतीश काळे,तेजस देवकाते, हनुमंत काजळे, सुनील काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी सुरेखा पोळ,गटविकास अधिकारी विजयकुमार परिट आदी उपस्थित होते.

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून ट्रॉमा केअर सेंटर इमारत मंजूर झाल्याचा व भिगवण येथील कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या पंचायत समितीच्या मागणीस यश आल्याचा दावा करत कोविड केअर सेंटरचे उद्घाटन पंचायत समितीच्या सभापती यांच्या हस्ते करण्यात आले.

परंतु राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या दि.8 ऑगस्ट रोजी च्या सुनिश्चित दौऱ्यामध्ये सायंकाळी ठीक सहा वाजता भिगवण येथील कोविड केअर सेंटरचे उदघाटन होणार असल्याचे स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला असतानाच दुपारीच सर्जिकल स्ट्राइक भाजपा कडून करण्यात आले.त्यामुळे
काल भिगवण येथील कोविड केअर सेंटरच्या(CCC) उदघाटन करण्यावरून राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं.

या नंतर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी रात्री कोविड केअर सेंटर येथे जाऊन उदघाटन केले.या वेळी बोलताना भरणे म्हणाले की
मी मंजूर करून आणलेल्या कामांचे विरोधक सुडबुदधीने राजकारण करतात.
त्यांना माझं एवढंच सांगणं आहे राजकारण करण्याची ही वेळ आणि जागा नाही.
इंदापूर, भिगवण, निमगाव, बावडा या ठिकाणी कोविड सेंटर चालू करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न केला आहे, पैकी निमगाव व बावडा याठिकाणी सुद्धा थोड्याच दिवसात कोविड केअर सेंटर चालू करावयाचे आहे.
आपल्याला गोरगरीब जनतेला मदत करायची आहे कोणी उद्घाटन करते याला महत्व नाही,परंतु या ट्रामा केअर मधील प्रत्येक वस्तू खरेदी करण्यापासून मी लक्ष दिले आहे,त्यामुळे एवढी मोठी भव्यदिव्य इमारत या ठिकाणी उभी राहिली.

या वेळी हनुमंत बंडगर,महेश देवकाते,डॉ चंद्रकांत खानावरे,डॉ मोरे,डॉ.शहा यांनी मनोगत व्यक्त केले.

दुधा वरून राजकारण तापलेले असतानाच आता कोविड केअर सेंटरच्या श्रेयवादावरून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी मध्ये चांगलीच जुंपण्याची शक्यता असून यादरम्यान सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचे काय होणार हा मोठा प्रश्न तालुक्यातील जनतेपुढे उभा राहिला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!