इंदापूरातील विशालची महसूल सहाय्यक पदावर निवड
महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार

इंदापूरातील विशालची महसूल सहाय्यक पदावर निवड
महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार
इंदापूर प्रतिनिधी –
इंदापूरातील विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज मधील वर्ष 2012 च्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचा विद्यार्थी विशाल बंडगर याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवत महसूल सहाय्यक अधिकारी म्हणून निवड झाली आहे. त्याच्या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. देशपांडे म्हणाले, “स्वप्न पाहणे आणि ती पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेणे हेच खरे यशाचे गमक आहे. हे विशाल याचे यश अधोरेखित करते. विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज,इंदापूरचा माजी विद्यार्थी म्हणून त्याचे हे यश महाविद्यालयासाठी अभिमानास्पद ठरले असून, भविष्यातील विद्यार्थ्यांसाठी हे निश्चितच एक प्रेरणादायी उदाहरण राहील.”
सत्काराला उत्तर देताना विशाल याने सांगितले की, “महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा प्रवास, अभ्यासातील शिस्त आणि आत्मविश्वासाच्या बळावर यश मिळाले आहे. अपयश आले तरी खचून न जाता चिकाटी जिद्द आणि प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते. त्यामुळे प्रयत्न करत राहावेत.”या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागप्रमुख सोमनाथ चिकणे यांनी केले.