इंदापूर

इंदापूरात आजी माजी मंत्र्यांची झाली अचानक भेट

झंझावाती दौऱ्यात अचानक झाली भेट.

इंदापूरात आजी माजी मंत्र्यांची झाली अचानक भेट

झंझावाती दौऱ्यात अचानक झाली भेट.
बारामती वार्तापत्र
इंदापूर तालुक्यातील सलग तीन पंचवार्षिक काट्याची टक्कर एकमेकांमध्ये होणारे आजी-माजी मंत्री महोदयांची एका लग्न सोहळ्यामध्ये अचानक समोरासमोर भेट झाली. दोघांनीही ही एकमेकांना नमस्कार घालत ख्यालीखुशाली विचारून आपापला मार्ग धरला. त्यामुळे काही काळ या भेटीची चर्चा उपस्थित यांसह तालुक्यात होताना दिसत आहे .
विद्यमान सार्वजनिक बांधकाम मृद व जलसंधारण वने पशुसंवर्धन दुग्धविकास सामान्य प्रशासन राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे व माजी सहकार व संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांची रविवारी एक नोव्हेंबर रोजी इंदापूर शहरातील एका विवाह सोहळ्यामध्ये अचानक का होईना पण समोरासमोर भेट झाली. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर हे दोघे एकदाही आज पर्यंत कोणत्याही कार्यक्रमाला वा एखाद्या सोहळ्याला एकत्रित असे उपस्थित राहिलेले नाहीत.

दरम्यान रविवारच्या या लग्न सोहळ्यानिमित्त यांची अचानक भेट घडल्याने या दोघांमध्ये काय चर्चा झाली याचीच चर्चा तालुक्यात रंगली आहे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे या लग्नसोहळ्याला भेट दिल्यानंतर काही काळ तेथे कार्यकर्त्यांशी चर्चा करीत होते. तेवढ्यात सायरन चा आवाज काढत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा ताफा या विवाह सोहळ्यात जवळ येऊन धडकला. राज्यमंत्री गाडीतून उतरले व विवाहातील नववधु जोडप्यांना भेटण्यासाठी जात असताना त्यांनी माजी मंत्री आणि आपले कट्टर विरोधक हर्षवर्धन पाटील यांना नमस्कार घातला पाटील यांनी देखील त्यांना प्रतिसाद देत नमस्काराला उत्तर दिले. एकमेकांनी ख्यालीखुशाली विचारली आणि दोघेही पुढील भेटीगाठी साठी झपाट्याने रवाना झाले.

इंदापूर तालुक्यात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे राज्याचा गाडा हाकत असतानाच शेजारीच असलेल्या सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री पदाची जबाबदारी त्यांच्यावर ती आहे या राबत्यातुन ते वेळ काढून आपल्या मतदारसंघात विविध कार्यक्रमांना कार्यकर्त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात सामील होण्यासाठी तारेवरची कसरत करत भेटीगाठी घेत असतात , तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हेदेखील आपल्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी झंझावाती दौरा करत असतात. यामध्ये राजकारणात सक्रिय झालेले त्यांचे सुपुत्र राजवर्धन पाटील तसेच जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील यादेखील तालुक्यात प्रत्येकाच्या सुखदुःखात मध्ये सहभागी होताना सातत्याने दिसत आहेत.

इंदापूर तालुक्यातील सध्या एकही गाव असे नाही की त्याठिकाणी भरणे व पाटील सुखदुःखात सामील झालेले नाहीत. दररोजचा राफ्ता उरकून हे दोन्ही कुटुंब तालुक्यातील आपल्या जागृत मतदाराच्या दारी जाऊन त्यांच्या सुख आणि दुःखात हिस्सेदार होत आहेत. आणि आपल्या पाठीशी यांचा कायम पाठिंबा राहावा यासाठी सदैव डोळ्यात तेल घालून प्रयत्नशील राहताना दिसत आहेत.

सध्या काही क्षणभर का होईना पाटील आणि भरणे यांची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर एकत्रितरीत्या कधीही भेट अथवा चर्चा झाली नव्हती ती चर्चा रविवारी त्यांच्या धामधुमीच्या घाई गडबडी च्या दौऱ्यामध्ये का होईना घडून आली . याची चर्चा कोरोना च्या काळामध्ये हॉटस्पॉट होताना दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!