इंदापूरात जनता कर्फ्यूची मागणी करत शहरातील सुज्ञ नागरिकांनी स्थानिक प्रशासनास दिली निवेदने.
कडक नियम व अटी घालण्याच्या केल्या मागण्या.
इंदापूरात जनता कर्फ्यूची मागणी करत शहरातील सुज्ञ नागरिकांनी स्थानिक प्रशासनास दिली निवेदने.
कडक नियम व अटी घालण्याच्या केल्या मागण्या.
इंदापूर:-प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील दिवसेंदिवस वाढत चाललेली कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या पाहता नागरिकांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून आज दि.7 सप्टेंबर रोजी शहरातील सुज्ञ नागरिकांनी जनता कर्फ्यू च्या मागणीकरिता इंदापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.प्रदीप टेंगल,पोलीस निरीक्षक सारंगकर,नायब तहसिलदार अभंगराव यांना निवेदने देऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
जनता कर्फ्यू करून दरम्यान खालील बाबींवर काम व्हावे अशी मागणी केली आहे.
नगरपालिका प्रशासन :
१. गावाच्या चारी चौकात चारी बाजुला चौक्या व मास्क बंदीची कारवाई व्हावी.
२.बाहेरुन गावावरुन येणारी वाहने व नागरिकांना मेडीकल एमरजेन्सी वगळता परवानगी देवु नये.
३. फिरथे पथक तयार करुन व्यापारी दुकाने मंडई गर्दीचे ठिकाणे १०० टक्के बंद ठेवावीत.
४. फवारणी निजुर्तीकरण वॉर्ड वाईज दररोज व्हावे.
५. सव्हेनुसार घर टु घर नागरिकांचे प्रबोधन आरोग्य तपासणी करुन विलगीकरण करावे.
६. २ दिवस अगोदर गावात वाहनाव्दारे तसेच बॅनरव्दारे चौकाचौकात जनता कर्फ्यू चे आवाहन करावे,जेणे करून नागरिकांची गैरसोय हेवु नये.
पोलिस प्रशासन :
१. गावाच्या चारी चौकात चारी बाजुला चौक्या व मास्क बंदीची कारवाई व्हावी.
२. व्यापारीबंद १०० टक्के यशस्वी होण्यासाठी फीरते पथक ठेवुन आव्हान व कारवाई करावी.
आरोग्य विभाग :-दवाखाने
१. वार्डवाइज घर टु घर तपासणी, जणजागृती व रुग्ण विलगीकरण.
२. गाळेधारक व्यावसायिक रिक्षावाले,मंडईवाले, किराणा दुकानदार यांची रॅपिड टेस्ट व्हावी.
व्यापारी बांधव:-
१. हा जनता कफर्यु आपल्या विरोधात नसुन कोरोना प्रादुर्भाव साखळी तोडण्यासाठी आहे.
२. अत्यावश्याक सेवा हॉस्पिटल व मेडिकल वगळता सर्वानी स्वस्फुर्तीने सहभागी व्हावे,
३. कर्फ्यू चे पालन न करणाऱ्या व्यापारी बांधवावर व्यापारी संघटनेने कारवाई करावी.
अशा आशयाची निवेदने स्थानिक संबंधित प्रशासनास दिली आहेत.
यावेळी विरोधीपक्ष नेते पोपट शिंदे,प्रशांत शिताप,प्रशांत उंबरे,नगरसेवक अमर गाडे,नगरसेवक दादासाहेब सोनवणे, वसीम बागवान, अरबाज शेख,फिरोज पठाण,शुभम पवार उपस्थित होते.