
इंदापूरात शिवधर्म फाउंडेशनचे उपोषण
एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..
इंदापूर; प्रतिनिधी
संभाजी ब्रिगेड संघटनेने संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख थांबवावा, या मागणीसाठी प्रशासकीय भवनासमोर इंदापूरात शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक (आण्णा) काटे यांच्यावतीने संभाजी ब्रिगेड संघटनेने संभाजी महाराजांचा होत असणारा एकेरी उल्लेख थांबवावा, व धर्मवीर छत्रपती संभाजी ब्रिगेड किंवा इतर कोणतेही नाव द्यावे, यासाठी मागील महिन्याचा कालावधी दिला होता. परंतु, संभाजी ब्रिगेड यांनी नाव बदलण्याचा निर्णय न घेतल्यामुळे मंगळवार (दि.25) फेब्रुवारी रोजी शिवधर्म फाउंडेशनतर्फे विविध भागात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले.
यावेळी शिवधर्म फाउंडेशनचे भैय्यासाहेब बंडगर,करणसिह ढाणे, किरणदादा साळुंखे,विशाल धुमाळ, निखिल मगर, काका किरकत, दत्ताआपा सुर्वे, प्रदीप जगदाळे, महादेव सूर्यवंशी,राम आसबे, नाना कोळेकर, शुभम डोंबाळे,मंथन पावर तेजस सूर्यवंशी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.