इंदापूर अर्बन बँकेच्या चेअरमन पदी देवराव जाधव, व्हाईस चेअरमन पदी सत्यशील पाटील यांची बिनविरोध निवड
प्रगतीसाठी कार्यरत राहून सी बँक सर्वसामान्यां पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन

इंदापूर अर्बन बँकेच्या चेअरमन पदी देवराव जाधव, व्हाईस चेअरमन पदी सत्यशील पाटील यांची बिनविरोध निवड
प्रगतीसाठी कार्यरत राहून सी बँक सर्वसामान्यां पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन
निलेश भोंग ; बारामती वार्तापत्र
चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी बँकेच्या संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत निमगांव केतकी चे देवराव जाधव यांची चेअरमनपदी तर वालचंदनगर चे सत्यशील पाटील यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवडची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निबंधक जे.पी. गावडे यांनी केली.
बँक ही दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक असून हजारो लोकांचे संसार या बँकेच्या दैनंदिन व्यवहारातून होत असतात. यावेळी बोलताना जाधव म्हणाले की माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली बँकेच्या प्रगतीसाठी कार्यरत राहून सी बँक सर्वसामान्यां पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन.
यावेळी बँकेच्या संचालक रामकृष्ण मोरे, विलासराव माने, अशोक शिंदे, संदीप गुळवे, आदिकुमार गांधी ॲड विकास देवकर, दादाराम होळ, भागवत पिसे, अविनाश कोथमिरे, उज्वला गायकवाड, अश्विनी ठोंबरे, उल्हास जाचक, ॲड विजय पांढरे मुख्य कार्यकारी अधिकारी तावरे उपस्थित होते.