इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक ३९ ऑक्सिजनयुक्त बेडसह १० व्हेंटिलेटर बेड २४ तास उपलब्ध करून नागरीकांना उपचारासाठी खुले.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले उद्घाटन.
इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक ३९ ऑक्सिजनयुक्त बेडसह १० व्हेंटिलेटर बेड २४ तास उपलब्ध करून नागरीकांना उपचारासाठी खुले.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले उद्घाटन.
बारामती वार्तापत्र ,इंदापूर:-प्रतिनिधी
राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र देशमुख यांच्यासह सर्वच विभागाच्या प्रशासकीय अधिकारी यांच्यासमवेत झालेल्या आढावा बैठकीप्रसंगी कोविड सेंटरमधिल अडी अडचणी जाणून घेतल्या होत्या.सदर मिटींगमध्ये सर्वसामान्य रूग्णांना येत असलेल्या अडचणी तात्काळ दूर होव्यात या अनुषंगाने राज्यमंत्री भरणे यांनी तत्परतेने इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक ऑक्सिजनयुक्त ३९ बेड तसेच १० व्हेंटिलेटर रूग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयोगी संसाधने २४ तासात उपलब्ध केली होती. त्याचे उद्घाटन दि.10 सप्टेंबर रोजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मंत्री भरणे यांनी स्वतः उपजिल्हा रूग्णालयात रूग्णांच्या आरोग्याची ही विचारपूस केली.
यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, तहसिलदार सोनाली मेटकरी,प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुहास शेळके,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.महाजन यांच्यासह उपजिल्हा रूग्णालयातील आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.