इंदापूर करांना मोठा दिलासा…
आज दहा कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी परतणार... एकाच कुटुंबातील दहा जणांना झाला होता कोरोना, त्याना आज डिस्चार्ज मिळणार...

इंदापूर करांना मोठा दिलासा…
आज दहा कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी परतणार…
एकाच कुटुंबातील दहा जणांना झाला होता कोरोना, त्याना आज डिस्चार्ज मिळणार…
इंदापूर :- सिद्धार्थ मखरे (तालुका प्रतिनिधी)
इंदापूर शहरातील एकाच कुटुंबातील असणाऱ्या दहा कोरोना ग्रस्तांना आज डिस्चार्ज मिळणार आहे.. त्यांना आज इंदापूर येथील कदम गुरुकुल CCC (कोविड केअर सेंटर) येथून दुपारी दोन वाजता डिस्चार्ज मिळणार आहे, त्यामुळे इंदापूर करांसाठी हा मोठा दिलासा आहे…
काही दिवसापूर्वी एका 38 वर्षीय महिलेला कोरोना ची लागण झाली होती त्यानंतर या महिलेच्या संपर्कात असलेल्यांची कोरोना संदर्भातली चाचणी घेण्यात आली आणि यावेळी एकच धक्कादायक प्रकार समोर आला कारण एकाच कुटुंबातील नऊ व्यक्तींना यावेळी कोरोना ची लागण झाली होती त्यामुळे शहर व तालुक्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
, गंभीर बाब म्हणजे यात एक वर्षाच्या चिमुकल्याचा समावेश होता…, पण त्यांच्यावरती यशस्वी उपचार केल्यानंतर आज दुपारी दोन वाजता राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या उपस्थितीत त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे..
इंदापूर शहरात एकूण अकरा कोरोनाग्रस्तांन वरती उपचार सुरु होते यातील एकाच कुटुंबातील दहा जणांना आज डिस्चार्ज मिळणार असून उर्वरित एकास उद्या डिस्चार्ज मिळणार असल्याचं इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक एकनाथ चंदनशिवे यांनी सांगितले आहे…
रुग्ण बरे झाले असले तरी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे तसेच नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन इंदापूरच्या नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी केले आहे..