इंदापूर करांसाठी धक्कादायक बातमी.
एकाच दिवसात पंधरा रुग्णांची वाढ.
इंदापूर:- सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
इंदापूर तालुक्यात आज दिनांक 15 जुलै रोजी तब्बल पंधरा कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत.निमगाव मध्ये कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला असून अकोले येथील कोरोनाग्रस्त असणाऱ्या रुग्णाच्या संपर्कातील नऊ जणांना कोरोनाची लागण झाली आहे तसेच इंदापूर येथील कोरोना रुग्णाच्या संपर्कातील पाच असे एकूण 15 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर एकनाथ चंदनशिवे यांनी दिली.