बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील विविध संघटनांच्या माध्यमातून रक्तदान शिबीर
शिबिरात तब्बल ३०३ बाटल्या रक्त संकलन झाले आहे.

बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील विविध संघटनांच्या माध्यमातून महा रक्तदान शिबीर
शिबिरात तब्बल ३०३ बाटल्या रक्त संकलन झाले आहे.
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील विविध संघटनांच्या वतीने आयोजित केलेल्या महा रक्तदान शिबिरात तब्बल ३०३ बाटल्या रक्त संकलन झाले आहे. शिबिराचे उद्घाटन वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या हस्ते पार पडले. रक्तदानाला सकाळी 9 वाजता सुरुवात झाली, सकाळी 9 वाजेपासून ते सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांपर्यंत तब्बल 303 बाटल्या रक्त संकलन करण्यात आले.
रक्तदान शिबिरात तरुणांचा मोठ्या संख्येने सहभाग
या रक्तदान शिबिरात तरुण व महिला देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. मात्र कोविड 19 ची लस घेतल्यानंतर 56 दिवस, तसेच कोविड होऊन गेल्यानंतर 30 दिवस रक्तदान करता येत नसल्याने, याचा मोठा परिणाम या रक्तदान शिबिरावर झाल्याचा पाहायला मिळाला. जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती प्रमोद काकडे, पंचायत समिती सभापती निता फरांदे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे, एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक रमाकांत गायकवाड, सोमेश्वरचे संचालक सिध्दार्थ गीते यांच्या पुढाकारातून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.