इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दत्तात्रय फडतरे
दत्तात्रय फडतरे यांची बिनविरोध निवड
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दत्तात्रय फडतरे
दत्तात्रय फडतरे यांची बिनविरोध निवड
इंदापूर:सिद्धार्थ मखरे (प्रतिनिधी)
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी दत्तात्रय साहेबराव फडतरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी आपल्या सभापती पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी दत्तात्रय फडतरे यांची निवड प्रक्रियेने वर्णी लागली आहे. दरम्यान नवनिर्वाचित सभापती दत्तात्रय फडतरे यांचा सन्मान करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
गुरूवार दि.21जानेवारी रोजी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पीठासीन अधिकारी जे.पी.गावडे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली. दत्तात्रय फडतरे यांचा एकमेव अर्ज आल्याने छानणी अंती निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निबंधक,सहकारी संस्था जे.पी.गावडे यांनी त्यांना सभापती म्हणून घोषीत केले.यावेळी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती व मोहोळ चे विद्यमान आमदार यशवंत माने,संचालक मधुकर भरणे, संग्रामसिंह निंबाळकर, मेघश्याम पाटील व सर्व संचालक उपस्थित होते.