इंदापूर कोविड केअर सेंटरमध्ये अधिकच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता इंदापूर काँग्रेस ने जिल्हाधिकारी यांना पाठविले पत्र.
इंदापूरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केली मागणी.
इंदापूर कोविड केअर सेंटरमध्ये अधिकच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता इंदापूर काँग्रेस ने जिल्हाधिकारी यांना पाठविले पत्र.
इंदापूरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केली मागणी.
इंदापूर:-प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील कोविड रुग्णांचा आकडा आज अखेर चारशेच्या वर गेलेला आहे,व आतापर्यंत तालुक्यातील 18 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झालेला असून इंदापूर शहरात ग्रामीणच्या तुलनेने कोरोनाग्रस्त रुग्ण जास्त प्रमाणात सापडत आहेत.
इंदापूर येथील कोविड केअर सेंटरमध्ये अत्याधुनिक व्हेंटिलेटर ची सोय व तज्ञ डॉक्टरांचा अभाव आहे, तसेच इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातही अपुऱ्या सोयीसुविधा आहेत. आत्तापर्यंत पाच ते सहा रुग्णांचा व्हेंटिलेटर न मिळाल्याने मृत्यू झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे, असा आरोप यावेळी काँग्रेसने दिलेल्या पत्रात नमूद केला असून त्या अनुषंगाने इंदापूर कोविड केअर सेंटरमध्ये अत्याधुनिक सोयी सुविधा युक्त व्हेंटिलेटर ची संख्या वाढवून तज्ञ डॉक्टरांना उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी इंदापूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तानाजीराव भोंग यांच्याकडून करण्यात आली आहे.