इंदापूर तालुका धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने इंदापूर तहसील कचेरीवर ढोल बजावो आंदोलन

समाज्याच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन

इंदापूर तालुका धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने इंदापूर तहसील कचेरीवर ढोल बजावो आंदोलन

समाज्याच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन

इंदापूर:-बारामती वार्तापत्र 
इंदापूर तालुका धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने आज दि.25 रोजी इंदापूर तहसील कार्यालयासमोर समाज्याच्या विविध मागण्यांसाठी ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले.

YouTube player

सरकारने धनगर समाजासाठी २२ सवलती लागू केल्या होत्या. तसेच शेळी मेंढीपालन महामंडळास १००० कोटी जाहिर केले होते. त्याची अंमलबजावणी त्वरीत करावी व आरक्षणासाठी जी फडणवीस सरकारने ठोस पावले उचलली होती. तशी या सरकारने उचलावीत या व इतर मागण्या मान्य करणेसाठी झोपलेल्या सरकारला जाग यावी यासाठी कृती समितीच्या वतीने तहसिलदार सोनाली मेटकरी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी माऊली चौरे, रामभाऊ पाटील, महेंद्र रेडके, रंजित पाटील,माऊली वाघमोडे,भाऊसाहेब अर्जुन, गणपत करे,बापू पारेकर,तानाजी मारकड,श्रावण चोरमले,बाळासाहेब डोंबाळे,पोपट कचरे, धनाजी देवाकाते, आबासो थोरात,नवनाथ दडस,संतोष देवकाते आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!