इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या संचालक पदी जयप्रकाश कांबळे
रिक्त झालेल्या जागी सर्वांनुमते निवड
इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या संचालक पदी जयप्रकाश कांबळे
रिक्त झालेल्या जागी सर्वांनुमते निवड
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळातील रिक्त असणाऱ्या संचालक पदावरती जयप्रकाश कांबळे यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली.शिक्षक पतसंस्थेचे सभापती वसंत फलफले यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत सुनिल मखरे हे संचालक सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागी संचालक पदी ही निवड करण्यात आली.
यावेळी शिक्षक समितीचे अध्यक्ष व संचालक ज्ञानदेव बागल,पतसंस्थेचे संचालक हरिश काळेल,सुनिल वाघ,किरण म्हेत्रे,नितीन वाघमोडे,संभाजी काळे,विलास शिंदे,ज्ञानदेव चव्हाण, सुनंदा भगत,हनुमंत दराडे,दत्तात्रय ठोंबरे,आदिनाथ धायगुडे, नानासाहेब नरुटे,बालाजी कलवले,सुनिल चव्हाण,गणेश सोलनकर, सचिव संजय लोहार उपस्थित होते.
यावेळी नुतन संचालक जयप्रकाश कांबळे यांनी माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांला संचालक पदी निवड केल्याबद्दल सर्व संचालक मंडळ व सभासदांचे आभार मानले व सदैव सभासद हितासाठी काम करणार असल्याचे सांगितले.यावेळी कांबळे यांचा सत्कार करुन त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी पतसंस्थेच्या सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.