इंदापूर तालुका युवक काँग्रेस अध्यक्षपदी मिलिंद साबळे यांची निवड
युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीचा निकाल जाहीर
इंदापूर तालुका युवक काँग्रेस अध्यक्षपदी मिलिंद साबळे यांची निवड
युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीचा निकाल जाहीर
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुका युवक काँग्रेस अध्यक्षपदी मिलिंद साबळे यांची निवड झाली आहे.जाहीर निवडणुकीच्या निकालानुसार मिलिंद साबळे यांना सर्वाधिक 2227 मते मिळाली.
नुकताच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.या निवडणुकीसाठी युवा नेत्यांची तालुका अध्यक्ष पदासाठी चांगलीच चुरस बघायला मिळाली होती. इंदापूर युवक अध्यक्ष पदाकरिता 4 उमेदवार रिंगणात होते.यामध्ये मिलिंद साबळे यांनी सर्वाधिक मत मिळवून अध्यक्ष पदी विराजमान झाले आहेत.
12 नोव्हेंबर 2021 ते 12 डिसेंबर 2021 दरम्यान सदस्यत्व मोहीम राबविण्यात आली. सदस्य बनताच ऑनलाईन रीत्या प्रदेश अध्यक्ष, महासचिव, शहराध्यक्ष व विधानसभा अध्यक्ष अशा चार पदाकरिता निवडणुक प्रक्रिया पार पडली.
इंदापूर तालुका युवक काँग्रेसच्या निवडणुकीत एकूण 5052 मतदान झाले.निकालानुसार साबळे यांना सर्वाधिक 2227 मते मिळाली तर अरूण राऊत यांना 785 मत मिळाल्याने त्यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
युवक तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याने साबळे यांना महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस सरचिटणीस तानाजी भोंग, ऊजेर शेख,राहुल अचरे,सुफियान जमादार,नितीन राऊत,संतोष शेंडे,अभिजीत गोरे,संदीप शिंदे,भुषण बोराटे,अक्षय शेलार,इंदापूर तालुका महिला अध्यक्षा सीमा कल्याणकर यांनी शुभेच्छा दिल्या.