इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी अक्षय कोकाटे
सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीच्या निकषांवर ही निवड

इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी अक्षय कोकाटे
सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीच्या निकषांवर ही निवड
इंदापूर : प्रतिनिधी बारामती वार्तापत्र
नेहमीच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले नरूटवाडी (ता.इंदापूर) येथील आग्रही युवा कार्यकर्ते अक्षय रमेश कोकाटे यांचा राजकिय क्षेत्रातील कार्याचा विचार करता इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे इंदापूर तालुकाध्यक्ष ॲड.शुभम निंबाळकर यांनी कोकाटे यांची सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीच्या निकषांवर ही निवड केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचे सामाजिक समतेचे विचार समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून करावयाचे असून उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी अनमोल योगदानाची अपेक्षा सदरील निवडपत्रकाद्वारे केली गेली आहे.