क्राईम रिपोर्ट

पाटस येथील दरोडयातील व घरफोडीतील पाच आरोपी अटक

दारोडेखोरातील एका दारोडेखोराला पकडले.

पाटस येथील दरोडयातील व घरफोडीतील पाच आरोपी अटक

दारोडेखोरातील एका दारोडेखोराला पकडले.

क्राईम; बारामती वार्तापत्र

दि.२१/१०/२०२१ रोजी रात्री ११:०० वाजता ते, दि.२२/१०/२०२१ रोजी ०५:०० वाजता चे सुमारास मौजे पाटस, ता.दौड, जि.पुणे येथील सायराबानु नुरूद्दीन शेख, रा. कुंभारगल्ली यांच्या घरी पहाटे ०२:०० वाजताचे सुमारास दरोडा पडल्याची, संदीप आबा खंडाळे यांच्या घरी घरफोडी झाल्याची, उन्हास पंढरीनाथ वळे जुनी बाजारपेठ, पाटस यांचे घरी, दिनकर कानोबा खराडे यांचे घरी व नागेश्वर सोसा. रेशनिंग दुकान फोडलेची माहिती पाटस पोलीस चौकीचे रात्रगस्तीचे पोलीस अंमलदार संदीप कदम यांना सदर घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी जावुन ग्रामस्थांच्या मदतीने दरोडा घालणारे इसमांचा पाठलाग करून जुनी बाजारपेठ पाटस पोलीस अंमलदार कदम यांनी चालाखीने सात दारोडेखोरातील एका दारोडेखोराला पकडले.

त्यावेळी कदम यांना त्यांच्या उजव्या पायाला त्या दरोडेखोरांनी लोखंडी पाईपने मारहाण केली. तसेच ग्रामस्थांवर दगडफेक केली. त्यामध्ये सदर दरोडेखोर पळुन जात असताना तोही खाली पडुन जखमी झालेला आहे. तात्काळ त्याला ताब्यात घेवुन त्याच्यावर उपचार करून त्याच्या साथीदारावर यवत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे.

तसेच सदर दरोडा पडलेची माहीती पोलीस अमलदार कदम यांनी पोलीस निरीक्षक श्री.नारायण पवार यांना फोनद्वारे कळवली असता मा.वरीष्टांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व पाटस पोलीस चौकिचे पालीस उप निरीक्षक संजय नागरगोजे, सहा .फौज.जगताप तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यामध्ये पो.हवा. गुरू गायकवाड, पो.हवा, निलेश कदम, पो. ना.गोसावी, पो.ना.रासकर, पो.कॉ.चवधर व इतर अंमलदार हे घटनास्थळी पोचुन पकडलेल्या आरोपींच्या पदतीने पळुन गेलेल्या इतर दरोडेखोरांचा मा.पो.नि. यांच्या मार्गदर्शनाखाली शोध घेत आहोत.

सदर घटनेबाबात यवत पोलीस ठाणे येथे सायराबानु नुरूद्दीन शेख यांच्या फिर्यादीवरून दरोडयाचा गुन्हा व संदीप आबा खंडाळे यांच्या फिर्यादीवरून घरफोडी केल्याचा गुन्हा दाखल केला असुन यातील आरोपी नामे १) सुधीर उर्फ कोंबडया पेनशिल्या उर्फ स्पेशन भोसले, रा.बेलवंडी स्टेश व त्याच्या मदतीने इतर फरार आरोपींचा शोध घेवुन ते मिळुन आल्याने आरोपी नामे २) सौरभ चिका गव्हाण रा.राहुरी, ३) अजय उर्फ साजन मोहन काळे, रा. तांदळी दुमाला, ४) निलेश रविंद्र काळे, रा. गटेगाडी, ता.पारनेर, ५) विक्रम सर्जेराव भैलुमे, रा.
आढळगाव यांना सदर गुन्हयाच्या तपासकामी अटक केली असुन सदर गुन्हयाचा तपास मा.डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधिक्षक सो, पुणे ग्रामीण, मा.अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते,बारामती विभाग, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, मा.पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.संजय नागरगोजे व इतर स्टाफ करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!