इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षपदी राजाराम सागर
तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटेंनी दिले निवडीचे पत्र

इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षपदी राजाराम सागर
तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटेंनी दिले निवडीचे पत्र
इंदापूर : प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजाराम निवृत्ती सागर यांची इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.याबाबतचे नियुक्तीपत्र तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे- पाटील यांनी दिले.
या नवनियुक्त बद्दल बोलताना राजाराम सागर म्हणाले की,राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे तसेच जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असून या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचे कार्य हाती घेणार आहे.तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे यांचे पुरोगामी विचार तळागाळात पोचविण्यासाठी मेहनत घेणार आहे.
या प्रसंगी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष सुरेश शिंदे,ज्येष्ठ नेते व तालुका उपाध्यक्ष तुकाराम गोलांडे, विद्यासागर घोगरे,सरचिटणीस सुभाष पवार-डरंगे,वसंत आरडे,बाभुळगाव चे माजी सरपंच संजय देवकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.