इंदापूर तालुक्यातील् जनतेच्या हक्काचे पाणी मिळावे यासाठी माळी सेवा संघ इंदापूर तालुक्याच्या वतीने निवेदन.
दर पाण्या वरती इंदापूर जनतेचा नैसर्गिक हक्क व् अधिकार प्राप्त झालेला आहे

इंदापूर तालुक्यातील् जनतेच्या हक्काचे पाणी मिळावे यासाठी माळी सेवा संघ इंदापूर तालुक्याच्या वतीने निवेदन.
दर पाण्या वरती इंदापूर जनतेचा नैसर्गिक हक्क व् अधिकार प्राप्त झालेला आहे
इंदापूर :बारामती वार्तापत्र
माळी सेवा संघ इंदापूर तालुका व् शहर पदाधिकारी यांनी आज तहसीलदार इंदापूर यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे. इंदापूर तालुका मधील २२ गावा साठी महाराष्ट्र शासन यांनी मंजूर केलेले ५ टीमसी पाणी हे जनते च्या हक्कचे आहे .मुळातच् इंदापूर तालुका मध्ये उजनी धारणाचे मोठ्या प्रमाणात पाण लोट क्षेत्र आहे. उजनी धरना साठी इंदापूर तालुका मधील अनेक गावे आणि शेतकरी व् जनता यांनी योगदान दिलेले आहे. सदर पाण्या वरती इंदापूर जनतेचा नैसर्गिक हक्क व् अधिकार प्राप्त झालेला आहे. हा पाणी प्रश्न अनेक दशाका पासून प्रलंबित होता .म्हणून २२ गावातील शेतकरी, जनता आणि गावे वंचित राहिलेली आहेत. म्हणूनच् इंदापूर चे लोकप्रतिनिधी दत्तात्रय भरणे मामा यांनी या विषया चा पाठ पुरावा करून ५ टीम सी पाणी इंदापूर कर यांच्या हक्कांचे मंजूर करून घेतले. नंतर पाणी मंजूरी चा आदेश रद्द करण्यात आला म्हणून माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य इंदापूर तालुका पदाधिकारी व् तालुक्यातील जनेते च्या वतीने शासना कडे मागणी करीत आहोत कि, तात्काळ ५ टी यम सी हक्कांचे पाणी शेती साठी पिण्या साठी मंजूर करून त्याची अंबलबजावणी करण्यात यावी अन्यथा माळी सेवा संघ इंदापूर तालुका पदाधिकारी व् जनतेच्या वतीने तीव्र स्वरुपचे आंदोलन करण्यात येईल असे इंदापूर तालुका अध्यक्ष बापुसाहेब बोराटे यांनी सांगितले.
निवेदन देते वेळी माळी सेवा संघाचे कायदेशीर सल्लागार महाराष्ट्र राज्य ॲड नितीन राजगुरू, तालुका अध्यक्ष बापूसाहेब बोराटे, तालुका महिला अध्यक्ष सौ वर्षा ताई भोंग, तालुका कार्यकारिणी सदस्य अक्षय माळी, बाळासाहेब झगडे, इंदापूर शहर अध्यक्ष सुहास बोराटे, संतोष जाधव इत्यादी उपस्थित होते.