इंदापूर तालुक्यातील कलाकारांची कदर पत्रकार संघाने केली – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.
पत्रकार संघ इंदापूर तालुका यांच्या वतीने कलाकारांना मोफत अन्नधान्याचे व वस्तूंचे किटचे वाटप.
इंदापूर तालुक्यातील कलाकारांची कदर पत्रकार संघाने केली – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका व शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका यांच्या वतीने कलाकारांना मोफत अन्नधान्याचे व वस्तूंचे किटचे वाटप इंदापूर तालुक्यातील सुरवड येथील श्री कृष्ण पॅलेस मंगल कार्यालय प्रांगणात रविवार ( दि. १२ ) जुलै रोजी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य अभिजित तांबिले, राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे पाटील, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष छायाताई पडसळकर, पत्रकार संघाचे मार्गदर्शक मधुकर गलांडे, मुख्य सचिव सागर शिंदे, इंदापूर तालुका उपाध्यक्ष संदीप सुतार, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख महेश स्वामी, प्रसिद्धीप्रमुख सोमनाथ ढोले, जिल्हा कार्यकारणी सदस्य भीमराव आरडे, सुरेशराव मिसाळ, निखिल कणसे, विजयराव शिंदे, दत्तात्रय गवळी, सचिन खुरंगे, उदयसिंह जाधव देशमुख, इम्तिहाज मुलाणी, रामदास पवार, शिवाजी पवार, शिवकुमार गुणवरे तसेच शिक्षक नेते दत्तात्रय तोरसकर, ज्येष्ठ नेते दत्तात्रय घोगरे, बाळासाहेब करगळ, नवनाथ रुपनवर, ह.भ.प.शेरकर महाराज, प्रेस फोटोग्राफर स्वप्नील चव्हाण, शंकर मासाळ यांच्यासह भजणी, विणेकरी, किर्तनकार, प्रवचणकार, भारुडकार, गोंधळी व इतर कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शासकीय नियमनुसार फिजिकल डिस्टनसींगचे पालन करत, सर्वांनी हँड सॅनिटायझरचा वापर केला