कोरोंना विशेष
इंदापूर तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा १५७ वर.
इंदापूर शहरात दोन तर भोडणी सणसर मध्ये प्रत्येकी एक नवे कोरोनाग्रस्त रुग्ण.
इंदापूर तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा १५७ वर.
इंदापूर शहरात दोन तर भोडणी सणसर मध्ये प्रत्येकी एक नवे कोरोनाग्रस्त रुग्ण.
इंदापूर:-प्रतिनिधी
आज (दि.२८) जुलै रोजी इंदापूर शहरातील कोविड केअर सेंटर लगतच असणाऱ्या राजेवली नगर येथील कोरोनाग्रस्त असणाऱ्या रुग्णाच्या संपर्कातील दोघांना कोरोनाची लागण झाली असून इंदापूर तालुक्यातील भोडणी येथील एकास तर सणसर येथील एका जणाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.एकनाथ चंदनशिवे यांनी दिली.मात्र सणसर येथील रुग्णांवर बारामतीमध्ये उपचार सुरू असून बाकी रुग्णांवर इंदापुरच्या कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरू आहेत.
इंदापूर तालुक्यातील १५७ जणांना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली असून तालुक्यातील अनेक गावांमध्ये रुग्ण सापडू लागल्याने नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण आहे.