इंदापूर तालुक्यातील जाधववाडी ग्रामपंचायत बिनविरोध घोषित करण्याची औपचारिकता बाकी
सात जागांसाठी सातच उमेदवारी अर्ज दाखल
इंदापूर तालुक्यातील जाधववाडी ग्रामपंचायत बिनविरोध घोषित करण्याची औपचारिकता बाकी
सात जागांसाठी सातच उमेदवारी अर्ज दाखल
इंदापूर:प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील जाधववाडी ग्रामपंचायतीतील सर्वच सात जागांसाठी सातच उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याने जाधववाडीतील ग्रामस्थांच्या सकारात्मक पुढाकारातून सदरील ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध होणार आहे.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केलेल्या आव्हानाला जाधववाडी ग्रामस्थांनी प्रतिसाद देऊन ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून दाखवण्याचा पहिला मान जाधववाडी ग्रामपंचायतीने मिळवला असून बिनविरोध घोषित करण्याची फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे.
ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीख 4 जानेवारी असून जाधववाडी प्रमाणेच तालुक्यातील इतर गावे जाधववाडी ग्रामस्थांचा आदर्श घेणार का? हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.