इंदापूर तालुक्यातील दहा जणांना कोरोनाची लागण.
इंदापूर शहरात दोन तर तालुक्यात आठ नवे कोरोनाग्रस्त रुग्ण.
इंदापूर तालुक्यातील दहा जणांना कोरोनाची लागण.
इंदापूर शहरात दोन तर तालुक्यात आठ नवे कोरोनाग्रस्त रुग्ण.
इंदापूर:-प्रतिनिधी.
इंदापूर तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कालच राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी इंदापूर गेस्ट हाऊस या ठिकाणी आढावा बैठक घेतली होती.या वेळी राज्यमंत्री भरणे यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन काही सूचना केल्या होत्या व त्या नंतर इंदापूर येथील कोविड केअर सेंटर (CCC) येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून रुग्णांची विचारपूस केली होती.
दरम्यान काल कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कातील एकूण 39 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी आज (दि.2 )रोजी तब्बल 10 जणांचा कोरोना चाचणी अहवाल हा पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिली आहे.
यामध्ये म्हसोबाचीवाडी 2, भिगवण 4, कळाशी 1, इंदापूर शहर 2, निमगाव केतकी 1 या ठिकाणच्या रुग्णांचा समावेश आहे.
सततच्या वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे स्थानिक प्रशासनाकडून वारंवार खबरदारी च्या सूचना करण्यात येत असून शासनाने घालून दिलेले नियम व अटी यांचे तंतोतंत पालन करण्याची गरज असल्याचे सांगितले जात आहे.