इंदापूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना ऑनलाइन शिक्षणासाठी कोविड 19 च्या कामातून कार्य मुक्त करण्याची स्वाभिमानी शिक्षक परिवाराची मागणी.
गटविकास अधिकारी परीट व गटशिक्षणाधिकारी बामणे यांच्याकडे दिले मागणीचे निवेदन.
इंदापूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना ऑनलाइन शिक्षणासाठी कोविड 19 च्या कामातून कार्य मुक्त करण्याची स्वाभिमानी शिक्षक परिवाराची मागणी.
गटविकास अधिकारी परीट व गटशिक्षणाधिकारी बामणे यांच्याकडे दिले मागणीचे निवेदन.
इंदापूर:-प्रतिनिधी
मार्च 2020 पासून इंदापूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षक गावोगावातील घरांमध्ये जाऊन सर्व्हेक्षण,कोवीड चेकपोस्ट नाके,कोविड 19 सेंटरवर ड्यूटी करीत आहेत. एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून प्राथमिक शिक्षक कधीही या कामापासून दूर गेला नाही. त्यांनी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडले आहे.
परंतू विद्यार्थ्यांची ऑनलाइन शिक्षणाचा वेग वाढविण्यासाठी प्राथमिक शिक्षकांना कोविड 19 च्या कार्यातून मुक्त करणे गरजेचे
आहे.त्याचप्रमाणे शिक्षकांना कोवीड 19 च्या ड्यूटीवर नियुक्त करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण न देता,पी.पी.इ किट सारखे साहित्य न देता कोविड सेंटरवर नियुक्त करण्यात आले आहेत.
रस्त्यांवर चेकपोस्ट साठी नियुक्त्या दिलेल्या आहेत, ग्रामीण आणि शहरी भागात घरोघर जाऊन टेंम्परेचर नोंद करून सर्व्हे करणे अशा प्रकारे आपला जीव धोक्यात घालून शिक्षक कोविड 19 ची कामे करत आहेत.
त्यामुळे शालेय शिक्षण व क्रिडा विभागचे, शासनपरिपत्रक क्र.संकीर्ण 2020/प्र.क्र.86/एस.डी. 6 दिनांक 17 ऑगस्ट 2020 अन्वये प्राथमिक शिक्षकांना ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी कोविड19 च्या कार्यातून कार्यमुक्त करण्याची मागणी इंदापूर तालुक्यातील स्वाभिमानी शिक्षक परिवारातील शिक्षक संघ, इब्टा, मागासवर्गीय शिक्षक संघटना,शिक्षक भारती या शिक्षक संघटनांनी
गटविकास अधिकारी विजयकुमार परीट आणि गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांच्याकडे केली आहे.
यावेळी शिक्षक संघ तालुकाध्यक्ष नानासाहेब नरुटे,इब्टा चे तालुकाध्यक्ष सहदेव शिंदे उपाध्यक्ष शशिकांत शेंडे , मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुहास मोरे,शिक्षक भारतीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण हे उपस्थित होते.