इंदापूर तालुक्यातील फोफावत असलेल्या अवैद्य धंद्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार काय भूमिका घेणार…?
इंदापूर तालुक्यातील जनता लोकप्रतिनिधींसह प्रशासनावर नाराज
इंदापूर तालुक्यातील फोफावत असलेल्या अवैद्य धंद्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार काय भूमिका घेणार…?
इंदापूर तालुक्यातील जनता लोकप्रतिनिधींसह प्रशासनावर नाराज
इंदापूर : सिद्धार्थ मखरे ( प्रतिनिधी )
विधानसभेनंतर प्रथमच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे इंदापूर येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाकरिता शनिवार दि.६ रोजी येणार असून शहरातील जुन्या बाजार समिती येथे जाहीर सभा होणार आहे.तालुक्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेली जनता, बेरोजगारी, अवैध धंद्यांचा सुळसुळाट, खाजगी सावकारी, नागरिकांचा प्रशासनावरील उडालेला विश्वास याविषयी उपमुख्यमंत्री काय बोलणार याकडे संबंध तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
पुणे जिल्हयाचे पालकमंत्री या नात्याने बारामती मधील अवैद्य धंदे व सावकारीला आळा घालण्यासाठी घेतलेली कठोर भूमिकेची अंमलबजावणी इंदापूर तालुक्यातही लागू होणार का? असा प्रश्न तालुक्यातील आम जनतेस पडला आहे.
सुरुवातीला राज्यमंत्री भरणे यांच्याविषयी जनतेमध्ये असलेली आपुलकी एका घडलेल्या घटनेने पार धुळीस मिळाल्याचे पहायला मिळाले. तालुक्यातील एका महिलेला आपल्या पोटच्या मुलावर झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी राज्यमंत्र्यांचा निवासस्थासमोर उपोषणास बसावे लागले होते.राज्यमंत्री यांच्या निवासस्थाना समोर महिलेला न्याय मागण्यासाठी उपोषणाला बसावे लागते ही सुद्धा पक्षाच्या दृष्टीकोनातून लाजिरवाणी गोष्ट आहे.यावेळी या महिलेवर झालेल्या अन्यायाचा उद्रेक राज्यमंत्र्यांच्या शर्टा पर्यंत पोहोचल्याचा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील माघील काही दिवसात घडलेल्या घटना आणि फोफावत असलेले अवैद्य धंदे यावरती उपमुख्यमंत्री अजित पवार काय बोलणार हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.