इंदापूर तालुक्यातील भावडी येथे आढळली मगर
वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील मौजे भावडी गावातील शेतकरी श्री. शिपकुले यांच्या विहिरीत मगर आढळून आली असून परिसरात खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच वन अधिकारी-कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.
शेतकरी श्री.शिपकुले यांनी विहिरीतील गाळ काढण्यासाठी पोकलेन मशीन आणले होते.परंतु काम सुरू करण्याअगोदरच मगर दिसून आल्याने शेतकरी शिपकुले यांनी त्वरित वन विभागाला माहिती दिली.माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.व विहिरीत पाणी काढण्याचे काम चालू असल्याचे वन अधिकारी अजय घावटे यांनी सांगितले. सदरील विहीर ही उजनी पाणलोट क्षेत्रापासून अंदाजे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असल्याने उजनीच्या पाणलोट क्षेत्रातून मगर विहिरीत आली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.दरम्यान बचाव पथक पुण्यावरून घटनास्थळाकडे रवाना झाले आहे.