इंदापूर तालुक्यातुन संग्रामसिंह देशमुख यांना मोठे मताधिक्य देऊ- हर्षवर्धन पाटील
पदाधिकारी व कार्यकर्ते सज्ज असल्याचे केले नमूद
इंदापूर तालुक्यातुन संग्रामसिंह देशमुख यांना मोठे मताधिक्य देऊ- हर्षवर्धन पाटील
पदाधिकारी व कार्यकर्ते सज्ज असल्याचे केले नमूद
बारामती वार्तापत्र
भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रचारार्थ इंदापूर येथे मंगळवारी (दि.17) हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली.
पुणे जिल्ह्यात पदवीधर मतदार नोंदणी इंदापूर तालुक्यात सर्वाधिक झालेली आहे, त्यानुसारच इंदापूर तालुक्यातुन संग्रामसिंह देशमुख यांना मोठे मताधिक्य दिले जाईल,अशी ग्वाही भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील दिली.
पुणे विभाग पदवीधर मतदार संघाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रचारार्थ इंदापूर येथे मंगळवारी (दि.17) हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यावेळी हर्षवर्धन पाटील बोलत होते.यावेळी उमेदवार संग्रामसिंह देशमुख उपस्थित होते.
यावेळी उमेदवार संग्रामसिंह देशमुख, भाजपचे तालुकाध्यक्ष शरद जमादार, तानाजी थोरात यांनी मनोगते व्यक्त केली.यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, इंदापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.आभार इंदापूर शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी मानले.