इंदापूर तालुक्यात आज दिवसभरात ५८ कोरोनाबाधित; १ जणाचा मृत्यू.
आजअखेर तालुक्यात १४८० कोरोनाबाधित झाले.

इंदापूर तालुक्यात आज दिवसभरात ५८ कोरोनाबाधित; १ जणाचा मृत्यू.
आजअखेर तालुक्यात १४८० कोरोनाबाधित झाले.
इंदापूर : बारामती वार्तापत्र
इंदापूर तालुक्यात आज दिवसभरात वेगवेगळ्या प्रयोगशाळांतील तपासणीतून ५८ जण कोरोनाबाधित आढळून आले. आजअखेर तालुक्यात १४८० कोरोनाबाधित झाले असून घरोघरी सर्वेक्षणास सुरवात झाल्याने येत्या काही दिवसांत कोरोनाबाधित अधिक संख्येने आढळून येतील, मात्र त्यानंतर कोरोनाला रोखण्यात मदत होणार आहे.
इंदापूर तालुक्यातील शासकीय तपासणीत आज आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये भादलवाडी येथील २७ वर्षीय पुरूष, बंडगरवाडी येथील ५५ वर्षीय महिला, लाखेवाडी येथील ४५ वर्षीय पुरूष, ६५ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
पळसदेव येथील ७० वर्षीय पुरूष, ६२ वर्षीय महिला, ४० वर्षीय पुरूष, ८ वर्षीय मुलगा, २७ वर्षीय पुरूष, इंदापूर येथील श्रीराम हौसिंग सोसायटी येथील ४० वर्षीय महिला, लासुर्णे येथील २४ वर्षीय पुरूष, २७ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
निरवांगी येथील १३ वर्षीय मुलगी, ९ वर्षीय मुलगा, भिगवण येथील ९ वर्षीय मुलगा, लुमेवाडी येथील ६३ वर्षीय पुरूष, इंदापूर सरस्वतीनगर येथील ३० वर्षीय पुरूष, सार्वजनिक बांधकाम विश्रामगृहातील ६० वर्षीय पुरूष, सराटी येथील ३९ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
डाळज नंबर १ येथील ७३ वर्षीय पुरूष, हिंगणगाव येथील ३३ वर्षीय पुरूष, निमगाव केतकी येथील ७ वर्षीय मुलगा, ५० वर्षीय महिला, भिगवण स्टेशन येथील ५० वर्षाची महिला, इंदापूर शहरातील रामदास गल्ली येथील ३७ वर्षीय महिला, ४ वर्षीय मुलगा, २८ वर्षीय पुरूष, ६० वर्षीय महिला, ६७ वर्षीय पुरूष, २६ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीत खासगी प्रयोगशाळेतील तपासणी झालेल्या इंदापूर तालुक्यातील आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये उध्दट येथील ३६ वर्षीय पुरूष, घोलपवाडी येथील ३० वर्षीय पुरूष, बिल्ट कॉलनी भादलवाडी येथील ४१ वर्षीय महिला, ४९ वर्षीय पुरूष, १७ वर्षीय युवती, १० वर्षीय युवती, ३४ वर्षीय महिला रूग्णाचा समावेश आहे.
बेलवाडी येथील ५२ वर्षीय महिला, मेन कॉलनी वालचंदनगर येथील २८ वर्षीय पुरूष, सोनाईनगर इंदापूर येथील ५३ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
इंदापूर रामदास गल्ली येथील ४८ वर्षीय पुरूष, ४० वर्षीय महिला, १८ वर्षीय पुरूष, ३४ वर्षीय पुरूष, २९ वर्षीय महिला, १३ वर्षीय युवकाचा समावेश आहे.
खडकपुरा येथील ५६ वर्षीय पुरूष, निमगाव केतकी येथील ५२ वर्षीय पुरूष, पिटकेश्वर येथील ४२ वर्षीय पुरूष, लाखेवाडी येथील ४० वर्षीय पुरूष, निमगाव केतकी येथील ६४ वर्षीय पुरूष, इंदापूर कासार पट्टा येथील ४१ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.