इंदापूर तालुक्यात आरोप-प्रत्यारोपाचे घाणेरडे राजकारण चालू:-तानाजीराव भोंग.
कामाच्या माध्यमातून राजकारण करण्याचा काँग्रेस शहराध्यक्ष यांचा सल्ला.
इंदापूर तालुक्यात आरोप-प्रत्यारोपाचे घाणेरडे राजकारण चालू:-तानाजीराव भोंग.
कामाच्या माध्यमातून राजकारण करण्याचा काँग्रेस शहराध्यक्ष यांचा सल्ला.
इंदापुर:- प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यात कोरोनाचे भयानक संकट वाढतच असून राजकारणानेही कळस गाठला आहे. भिगवण येथील कोविड सेंटरचे दोनदा उद्घाटन पार पडले हे दुर्दैवी असून, कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शहरातील सत्ताधारी व विरोधकांनी अशीच तत्परता दाखवावी असा महत्वाचा सल्ला काँग्रेसचे शहराध्यक्ष तानाजीराव भोंग यांनी दिला आहे.
कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले असून, प्रतिबंधात्मक उपाययोजना मात्र होताना दिसत नाहीत. तालुक्यात फक्त आरोप-प्रत्यारोपांचे घाणेरडे राजकारण चालू आहे, तर इंदापूर शहरात देखील ग्रामीण भागापेक्षा फार भयावह परिस्थिती निर्माण झाली असताना कोविड केअर सेंटरचे दोन दोन वेळा उद्घाटन केले जात असून अशा संकटातही श्रेय घेण्याचं घाणेरडं राजकारण सुरू असल्याचे मत काँग्रेसचे शहराध्यक्ष तानाजीराव भोंग यांनी मांडले आहे.
सुस्त पडलेली नगरपालिका, मूग गिळून गप्प बसलेले विरोधक हे गणित नकळण्यापलिकडचे असून, सत्ताधारी व विरोधकांनी निवडणुकीप्रमाणे आताही तसाच उत्साह दाखवून कोरोनावर मात करण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करावी. व्हेंटिलेटर बरोबरच अन्य वैद्यकीय सुविधांअभावी अनेकांना आपला जीव गमवावा लागला असल्याचे त्यांनी म्हटले असून, बुधवारी मध्यरात्री व्हेंटिलेटर अभावी एकाला जीव गमवावा लागल्याचेही नमूद केले. आजी माजी मंत्र्यांनी कामाच्या माध्यमातून राजकारण करावे, वार पलटवाराच्या फैरींमध्ये जनतेला रस नाही, नव्हे गरजही नाही. कोरोनाच्या संकटात काम करण्याची सर्वांना समान संधी असून, कामाच्या माध्यमातून राजकारण करावे असा सल्ला तानाजीराव भोंग यांनी सत्ताधारी व विरोधकांना दिला आहे.
भोंग यांनी नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांचे सद्याच्या कठिण प्रसंगात दिलासादायक काम तर सोडाच, जबाबदार पदाधिकाऱ्यांचे साधे एक वक्तव्य देखील नसणे दुर्दैवी असल्याचे सांगताना,
इंदापूर शहरातील सर्व व्यापाऱ्यांची कोरोनावरील अँटिजिन चाचणी करावी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी शहरातील लोकांना अर्सेनिक अल्बम, काढा तरी वाटावा अशी मागणी करतानाच, तालुक्याचे आमदार राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर शहरात गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.