इंदापूर तालुक्यात कोरोनाची शंभरी पार, एकाच दिवसात कोरोनाचे 13 नवे रुग्ण.
इंदापूर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये होत आहे वाढ.
इंदापूर तालुक्यात कोरोनाची शंभरी पार, एकाच दिवसात कोरोनाचे 13 नवे रुग्ण.
इंदापूर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये होत आहे वाढ
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
इंदापूर तालुक्यातील माघील दोन दिवसात सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कातील 76 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती,त्यापैकी आज दिनांक 21 जुलै रोजी सकाळी या 76 जणांपैकी तेरा व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यामध्ये मदनवाडी मध्ये एक,वरकुटे येथे नऊ,गोतोंडी येथे एक तसेच निमगाव येथे दोन रुग्णांची भर पडलेली आहे अशी माहिती तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिली.
दिवसेंदिवस इंदापूर तालुक्यातील कोरोनाची आकडेवारी वाढत असल्याने इंदापूर तालुका हॉटस्पॉट च्या दिशेने जात आहे की काय असे प्रश्नचिन्ह तालुक्यातील नागरिकांन पुढे उभे राहिले असून लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
इंदापूर तालुक्यातील रुग्णाची संख्या शंभरी पार गेली असल्याने कोरोनाला रोखण्याचे प्रशासनापुढे मोठे आव्हान असणार आहे.तसेच नागरिकांनी सुद्धा ही परिस्थिती गांभीर्याने घेण्याची गरज आहे.