इंदापूर तालुक्यात कोरोनाचा कहर;कारागृहातील 18 कैद्यांना कोरोनाची लागण.
प्रशासनाची वाढली डोखेदुखी.
इंदापूर तालुक्यात कोरोनाचा कहर;कारागृहातील 18 कैद्यांना कोरोनाची लागण.
प्रशासनाची वाढली डोखेदुखी
इंदापूर:-प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यात सलग दुस-या दिवशीही कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून आज नव्याने 46 व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून यामध्ये 17 कैद्याचां देखील समावेश असल्याची माहीती खात्रीलायक सुत्रांकडून मिळाली आहे.
आज दि.26 ऑगस्ट रोजी एकूण 109 रँपिड अँटिजन चाचण्या करण्यात आल्या त्यापैकी 46 व्यक्तींचा चाचणी अहवाल हा पाँझिटीव्ह आला आहे. काल कारागृहातील एका व्यक्तीची कोरोना चाचणी करण्यात आली होती व त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कातील 21 कैद्यांची रॅपिड टेस्ट आज करण्यात आली त्यापैकी 17 कैद्यांचा रॅपिड चाचणी अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे.आता थेट कोरोनाचा शिरकाव कारागृहात झाल्याने प्रशासनाची डोखेदुखी वाढली असून एवढ्या मोठ्या प्रमाणावर रुग्णांचा आकडा वाढत असल्याने इंदापूर तालुक्यातील जनतेच्या चिंतेत अधिकची भर पडल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.इंदापूर तालुक्यातील कोरोनाच्या संख्येने आता सहाशेचा आकडा ओलांडला असून नागरिकांनी अधिकची काळजी घेण्याची गरज आहे.