इंदापूर तालुक्यात नव्याने ३६ जण पाॅझिटिव्ह तर तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २११४
इंदापूर तालुक्यात नव्याने ३६ जण पाॅझिटिव्ह तर तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २११४
इंदापूर : बारामती वार्तापत्र
इंदापूर तालुक्यात काल आढळलेल्या २२ कोरोनाग्रस्तांनंतर शेळगाव येथील ८० वर्षीय पुरूष ६५ वर्षीय महिला व १२ वर्षीय युवक व कळंब येथील ६५ वर्षीय महिला व बारामतीच्या तपासणीत सणसरमधील ६३ वर्षीय पुरूष रुग्ण कोरोनाबाधित आढळले होते.
इंदापूर तालुक्यातील शासकीय तपासणीत आज आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सावतामाळीनगर इंदापूर येथील ४७ वर्षीय महिला, २२ वर्षीय महिला, १९ वर्षीय पुरूष, बोरी येथील ७० वर्षीय महिला, ५० वर्षीय महिला, लाखेवाडी येथील २६ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
भवानीनगर येथील कामगार कॉलनीतील ६० वर्षीय पुरूष, ४७ वर्षीय महिला, लासुर्णे येथील २९ वर्षीय महिला, थोरातवाडी येथील ६२ वर्षीय पुरूष, जंक्शन येथील २८ वर्षीय पुरूष, गागरगाव येथील ८० वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
दत्तनगर इंदापूर येथील ५१ वर्षीय पुरूष, कौठळ येथील १८ वर्षीय पुरूष, जंक्शन येथील १७ वर्षीय युवक, बावडा येथील ५९ वर्षीय पुरूष, निमगाव केतकी येथील ४२ वर्षीय महिला, २१ वर्षीय युवक, जंक्शन येथील ५२ वर्षीय पुरूष या रुग्णांचा समावेश आहे.
इंदापूर तालुक्यात आज आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये काझड येथील ४३ वर्षीय पुरूष, जंक्शन, साईनगर येथील ५२ वर्षीय महिला, ६० वर्षीय पुरूष, ग्रीन पार्क अकलूज रोड इंदापूर येथे ६५ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
पवारवाडी येथील २९ वर्षीय पुरूष, मदनवाडी येथील ७६ वर्षीय महिला, निमगाव केतकी, इरीगेशन बंगला येथील ४८ वर्षीय पुरूष, इंदापूर येथील पाटील बंगला येथील ३३ वर्षीय महिला, ३६ वर्षीय महिला, पवारवस्ती अजोती येथील ६६ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
गिरीजा लॅबोरेटरी बारामतीत तपासलेल्या इंदापूर तालुक्यातील नमुन्यांमध्ये दोन जण कोरोनाग्रस्त आढळले आहेत. यामध्ये जाचकवस्ती येथील २९ वर्षीय पुरूष, ३० वर्षीय पुरूष या दोन रुग्णांचा समावेश आहे.