कोरोंना विशेष
इंदापूर तालुक्यात पुन्हा आढळला कोरोना रुग्ण.
शेळगाव येथील एका २२ वर्षीय युवतीला कोरोनाची लागण.

इंदापूर तालुक्यात पुन्हा आढळला कोरोना रुग्ण.
शेळगाव येथील एका २२ वर्षीय युवतीला कोरोनाची लागण
इंदापूर:- सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्रातील २७ वर्षीय परिचारिकेचा कोरोना अहवाल आज दि.११ जुलै रोजी सकाळी पॉझिटिव्ह आला होता परंतु आता मिळालेल्या माहितीनुसार शेळगाव येथील एका २२ वर्षीय युवतीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ एकनाथ चंदनशिवे यांनी दिली असून या युवतीच्या संपर्कात किती लोक आले आहेत याचा शोध सध्या सुरू असून युवतीवर इंदापूर येथील कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरू आहेत. सदर युवतीस कोरोनाची लागण पुणे येथे कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याने झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.