इंदापूर तालुक्यात महामार्गावर ८ गावांच्या ठिकाणी अंडरग्राउंड बायपास रस्ते ; नितीन गडकरींची मान्यता
हर्षवर्धन पाटील यांनी दिली माहिती

इंदापूर तालुक्यात महामार्गावर ८ गावांच्या ठिकाणी अंडरग्राउंड बायपास रस्ते ; नितीन गडकरींची मान्यता
हर्षवर्धन पाटील यांनी दिली माहिती
इंदापूर: प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यात महामार्गावर असलेल्या गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आहेत, तसेच गावातून येजा करताना रस्ते ओलांडताना अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अपघात टाळणेसाठी इंदापूर तालुक्यातील महामार्गावरील ८ गावांच्या ठिकाणी अंडरग्राउंड बायपास रस्ते करण्यास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी बुधवारी (दि.१०) नवी दिल्ली येथे मान्यता दिली, अशी माहिती भाजप नेते व माजी मंत्री पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
नवी दिल्ली येथे हर्षवर्धन पाटील यांनी दि.१० रोजी सकाळी नितीन गडकरी यांची भेट घेऊन पुणे- सोलापूर महामार्ग व संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या अडचणी संदर्भात चर्चा केली.
भादलवाडी, डाळज नं.२, काळेवाडी नं.१, काळेवाडी नं.२, पळसदेव, वरकुटे पाटी, गलांडवाडी नं.१ ,भिगवण आदी ठिकाणी हे अंडरग्राउंड बायपास रस्ते होतील, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, पुणे-सोलापूर महामार्गावर अनेक ठिकाणी अद्यापी सर्विस रस्ते करण्यात आलेले नाहीत.या महामार्गावर कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्यासमोरील कालठण सर्विस रस्त्यासह इतर ठिकाणी नवीन सर्विस रस्ते करण्याचे तसेच सध्याचे सर्विस रस्ते दुरुस्त करण्याचे आदेश नितीन गडकरी यांनी सचिवांना दिले.तसेच कुरकुंभ ते सरडेवाडी दरम्यान महिलांसाठी ठीकठिकाणी स्वच्छतागृहे तातडीने बांधण्याचे आदेश नितीन गडकरी यांनी दिल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
पालखी मार्गाचे पैसे तातडीने -हर्षवर्धन पाटील
संत तुकाराम महाराज पालखी मार्गासाठी जमीन हस्तांतरण हे बाजार मूल्यानुसार होऊन सर्वच शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा व पैसे वेळेवर मिळत नाहीत, अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. या तक्रारीवर नितीन गडकरी यांनी सेक्रेटरी यांना आदेश देऊन जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने सर्वच शेतकऱ्यांना पैसे अदा करण्याचे आदेश दिले, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.