इंदापूर तालु्क्यात आज ९० जण कोरोनाबाधित; निमगाव केतकीत सिरो सर्व्हे; ११ जण कोरोनाबाधित.
इंदापूर तालुक्यात आज निमगाव केतकी येथे सिरो सर्व्हे करण्यात आला.
इंदापूर तालु्क्यात आज ९० जण कोरोनाबाधित; निमगाव केतकीत सिरो सर्व्हे; ११ जण कोरोनाबाधित
इंदापूर : बारामती वार्तापत्र
इंदापूर तालुक्यात आज निमगाव केतकी येथे सिरो सर्व्हे करण्यात आला. यामध्ये तब्बल ११ जण कोरोनाबाधित आढळून आले. तर इंदापूर तालुक्यात भिगवण, इंदापूर व बारामतीतील तपासणीतून एकूण ९० जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
निमगाव केतकी येथे झालेल्या सिरो सर्व्हेत १२ हजार ३५५ जणांची तपासणी करण्यात आली. त्याकरीता ४५ पथके नियुक्त केली होती. यामध्ये ६८ जण संशयित आढळले. त्यांची रॅपीड अॅंटीजेन तपासणी केल्यानंतर त्यातील ११ जण कोरोनाग्रस्त आढळले. ५६ जणांना क्वारंटाईन करण्यात आले.
इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे तपासलेल्या कोरोनाबाधितांमध्ये भिगवण येथील ७० वर्षाीय पुरूष, मदनवाडी येथील ४० वर्षीय महिला, अकोले येथील २५ वर्षीय युवक, २१ वर्षीय मुलगी, सिनार मास कंपनी ५१ वर्षीय पुरूष, बंडगरवाडी, पोंदवडी येथील १० वर्षीय मुलगा, १६ वर्षीय मुलगी, ३५ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
इंदापूर येथे तपासलेल्या कोरोनाबाधितांमध्ये बेलवाडी येथील ३० वर्षीय पुरूष, ३ वर्षीय महिला, २१ वर्षीय युवती, ८ वर्षीय मुलगा, ७० वर्षीय महिला, ५ वर्षीय मुलगी, लाखेवाडी येथील ३० वर्षीय पुरूष, भिगवण येथील ३५ वर्षीय पुरूष, टण्णू येथील ३३ वर्षीय पुरूष, चांडगाव येथील ४५ वर्षीय पुरूष, भादलवाडी येथील ८ वर्षीय मुलगा, गणेशवाडी येथील ८० वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
लासुर्णे येथील २५ वर्षीय युवक,२४ वर्षीय महिला, ६० वर्षीय पुरूष, येथीलच ३३ वर्षीय पुरूष, २९ वर्षीय महिला, ६० वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश.