इंदापूर

इंदापूर नगरपरिषदेच्या माध्यमातून पर्यावरण संतुलन व रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियान

नगरसेवक अनिकेत वाघ यांच्या प्रयत्नातून प्रभाग एक मध्ये सर्वे.

इंदापूर नगरपरिषदेच्या माध्यमातून पर्यावरण संतुलन व रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियान

नगरसेवक अनिकेत वाघ यांच्या प्रयत्नातून प्रभाग एक मध्ये सर्वे.

इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )

नगरपरिषदेच्या प्रभाग क्र.१मध्ये नगरसेवक अनिकेत वाघ यांच्या प्रयत्नाने माझी वसुंधरा अभियान हाती घेण्यात येणार आहे.त्या संदर्भात नगराध्यक्षा अंकीता शहा यांच्या समवेत वाघ व नगरपरिषदेच्या अधिका-यांनी त्या भागातील सर्वेक्षण केले.

पत्रकारांशी बोलताना नगरसेवक अनिकेत वाघ म्हणाले की,स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पर्यावरण संतुलन व रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियान हाती घेण्यात येते.पृथ्वी,वायू,जल,अग्नी,आकाश या पंचतत्त्वावर आधारित वनीकरण,वनसंवर्धन,घनकचरा,सांडपाणी व्यवस्थापन,जमिनीची धुप थांबवणे, प्रदूषण कमी करणे,हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे, नदीसंवर्धन,सागरी जैवविविधता,जलस्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण,सागरी किनार्‍याची स्वच्छता करणे,उर्जेचा परिणामकारक वापर करणे,तिचा अपव्यय टाळणे,अपारंपरिक उर्जेच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येतात. हे अभियान राबवण्याच्या दृष्टीने नगराध्यक्षा अंकीता शहा व नगरपरिषदेच्या अधिका-यांच्या उपस्थितीत प्रभाग क्र.१ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले.

या अभियानांर्तंगत महावितरण विभागाचे कार्यालय,पाटबंधारे वसाहती लगतचा परिसर, उपजिल्हा रुग्णालया जवळच्या भागात शोभिवंत झाडे लावण्यात येणार आहेत.तेथे हरित पट्टा तयार करण्यात येणार आहेत.लोकांना बसण्यासाठी बाक बसवण्यात येणार आहेत. नंतरच्या काळात प्रभागातील नागरिकांशी संवाद साधून इतर आवश्यक उपक्रम राबवण्याचा विचार आहे,अशी माहिती वाघ यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!