इंदापूर नगरपरिषदेनी लढवली नामी शक्कल! पुष्पाभाई म्हणतोय,मै झुकेगा नहीं ; लेकिन कचरा दिखेगा तो झुकेगा भी डस्टबिन में डालेगा भी साला….
नगरपरिषदेकडून भिंती चित्राच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती
इंदापूर नगरपरिषदेनी लढवली नामी शक्कल! पुष्पाभाई म्हणतोय,मै झुकेगा नहीं ; लेकिन कचरा दिखेगा तो झुकेगा भी डस्टबिन में डालेगा भी साला….
नगरपरिषदेकडून भिंती चित्राच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती
इंदापूर : प्रतिनिधी
नुकताच प्रसिद्ध झालेला पुष्पा चित्रपट सर्वत्र सुपरहिट झाला. चित्रपटातील नायक ‘पुष्पा’ आणि खऱ्या जीवनातील अल्लू अर्जुन याला प्रेक्षकांनी जणू काय डोक्यावर घेतले. सोशल मीडियावर तर या चित्रपटातील डायलॉग आणि गाण्यांवर प्रचंड रिल्स पाहायला मिळत असतानाच इंदापूर नगरपरिषदेने शहरातील भिंतीवर पुष्पा रेखाटला आहे.
चित्रपटातील पुष्पा मै झुकेगा नही साला असं म्हणत प्रचंड भाव खातोय मात्र इंदापूरातील पुष्पाभाई मात्र मैं झुकेगा नही लेकिन कचरा दिखेगा तो झुकेगा भी और डस्टबिन में डालेगा भी साला म्हणताना दिसत आहे.
इंदापूर नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत मोहिमेत देशपातळीवर सलग तीन-चार वर्ष पारितोषिके मिळवली आहेत. आणि आता देखील शहराचे नाव देशपातळीवर उंचावण्याचा नगरपरिषदेचा प्रयत्न आहे. शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती व्हावी या कारणास्तव शहरात विविध ठिकाणी बोलकी चित्रे रेखाटण्यात आली असून हे पुष्पा चे चित्र मात्र शहरात चर्चेचा विषय बनले आहे.