इंदापूर

इंदापूर नगरपरिषदेने केली सायकल प्रेमींसाठी स्वतंत्र सायकल मार्गाची निर्मिती

नगराध्यक्ष अंकिता शहा व सायकल क्लबच्या सदस्यांनी केले लोकार्पण

इंदापूर नगरपरिषदेने केली सायकल प्रेमींसाठी स्वतंत्र सायकल मार्गाची निर्मिती

नगराध्यक्ष अंकिता शहा व सायकल क्लबच्या सदस्यांनी केले लोकार्पण

इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर शहरात शंभर फुटी रोड नवीन प्रशासकीय इमारत ते मंगेश पाटील रुग्णालयापर्यंत च्या दुतर्फा बाजूस सायकल प्रेमींसाठी स्वतंत्र सायकल ट्रक ची निर्मीती इंदापूर नगर परिषदेकडून करण्यात आली असून मंगळवार (दि.१६) फेब्रुवारी रोजी इंदापूर च्या प्रथम नागरिक तथा नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर सायकल क्लबचे संस्थापक सुनिल मोहिते व सदस्य दशरथ भोंग यांच्या हस्ते फित कापून याचे लोकार्पन करण्यात आले.

इंजिनियर रवीराज राऊत,विलास चव्हाण,आंबादास नाळे आणि धनाजी भोंग या नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी हा ट्रक तयार करण्यासाठी नगराध्यक्षा अंकिता शहा व मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेतले आहेत.

या लोकार्पनानंतर इंदापूर सायकल कल्बचे संस्थापक सुनिल मोहिते,सदस्य दशरथ भोंग, अस्लम शेख,अदित्यराज मोहिते, उमेश राऊत,रमेश शिंदे,अमित बधे यांसोबत विश्वतेज पोळ,प्रधुम्ज्ञ लोहिरे,विवेक चव्हाण,रोमक काझी, अरमान मोमीन या सर्वांच्या उपस्थितीत नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी पती मुकुंद शहा यांसोबत सायकल राईड मारली. दरम्यान सर्व उपस्थितांना माझी वसुंधरेची शपथ देखिल देण्यात आली.

यावेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा,नगरसेवक जगदीश मोहिते,प्रशासकीय अधिकारी वर्षा क्षिरसागर, शार्दूल ताजने,मनोज बारटक्के,भागवत मखरे,सुरेश सोनवणे, अल्ताब पठाण, सामाजिक कार्यकर्ते नितीन मखरे,रमेश धोत्रे, हमीदभाई आत्तार,जावेद शेख,लिलाचंद पोळ,अशोक चिंचकर, दिपक शिंदे, सुधीर पारेकर आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!