इंदापूर नगरपरिषदेमार्फत एकाच वेळी होणार घरोघरी सर्वेक्षण.
प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रत्यक्षात घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाणार.
इंदापूर नगरपरिषदेमार्फत एकाच वेळी होणार घरोघरी सर्वेक्षण.
प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रत्यक्षात घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाणार.
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तहसील, इंदापूर नगरपरिषद, इंदापूर उपजिल्हा रुग्णालय, इंदापूर पोलिस स्टेशन यांच्या संयुक्तपणे उद्या दि.12 सप्टेंबर रोजी एकाच दिवशी विविध विभागाचे कर्मचारी व शिक्षक हे शहरातील सर्व घरोघरी जाऊन नागरिकांची ऑक्सीजन, थर्मामीटर गण, पल्समीटर द्वारे, कोरोना लक्षणाचे सर्वेक्षण करून कोरोना रुग्णांचे ट्रेसिंग करणार आहेत. यासंदर्भात आज भार्गव बागेतील परिसरामध्ये तहसीलदार सोनाली मेटकरी, नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे, इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर तसेच इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांच्या उपस्थितीत नियोजनाची बैठक घेण्यात आली.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रत्यक्षात घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाणार असल्याचे मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले. सर्वेक्षण करत असताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची कशाप्रकारे सर्वेक्षण करावयाचे याविषयीची माहिती डॉ. प्रदीप ठेंगल यांनी कर्मचाऱ्यांना यावेळी दिली.
सोनाली मेटकरी म्हणाल्या की,’ गेली अनेक महिने आपण सर्वजण या मोठ्या संकटाचा सामना करत आहोत. हे कार्य पार पडत असतांना अनेक चांगले वाईट अनुभव आले. प्रामाणिक कर्तव्य केले तर त्याचे आपल्याला चांगले फळ मिळते. तुम्ही करत असलेल्या कार्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत. सर्व प्रकारची काळजी घेऊन सर्वेक्षण करावे. शासनामार्फत सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध करून दिल्या जातील.
अंकिता शहा म्हणाल्या की,’ इंदापूर शहरातील नागरिकांनी सर्वेक्षणाला सहकार्य करावे. लॉकडाऊन नंतरही आपण आपली काळजी घेण्यासाठीच्या सूचना सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना द्यावी. कोरोना संदर्भातील नियमांचा प्रामाणिकपणे अवलंब करावा तसेच स्वच्छता पाळावी. आपण करत असलेल्या कोरोना सर्वेक्षणामुळे इंदापूर शहर कोरोना मुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करेल.’
डॉ. एकनाथ चंदनशिवे यांनी हॅन्डग्लोज कसा वापरायचा याचे प्रात्यक्षिक दाखवून शासनामार्फत सर्व प्रकारच्या औषधाचा पुरवठा कोरोना रुग्णांसाठी केला जातो असे सांगून कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी यासंदर्भात मार्गदर्शन केले.
नारायण सारंगकर म्हणाले की ,’गेले अनेक दिवस या कोरोना महामारीमध्ये आम्ही आमचे कार्य पार पाडत आहे. आपण सर्वांनी न घाबरता योग्य काळजी घेऊन, योग्य आहार आणि व्यायामाने आपण तंदुरुस्त राहू शकतो हे लक्षात घेऊन त्यासाठी आपण प्रयत्न करावा. सतत हात धुवावा, तोंडावरील मास्क काढू नका.’
मुकुंद शहा म्हणाले की,’ एकाच वेळी सर्वेक्षण करुन ही साखळी तोडण्यासाठीची योजना आपण जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करत असून विविध प्रशालेतील व महाविद्यालयातील शिक्षक देखील इंदापूर नगरपरिषदेस सहकार्य करीत आहेत. मीच माझ्या कुटुंबाचा रक्षक या भावनेतून सर्वांनी आपली काळजी घ्यावी.
या नियोजन बैठकीचे सूत्रसंचालन सुभाष ओव्हाळ यांनी केले. आभार प्रवीण धाईंजे यांनी मानले.
गजानन पुंडे, वर्षा क्षीरसागर, अल्ताप पठाण, विलास चव्हाण, रमेश शिंदे यांनी कोरोना सर्वेक्षण आयोजन संदर्भात सहकार्य केले.